Home » ठळक बातम्या » वाई विधानसभा मतदार संघात यावेळेस तिरंगी लढत

वाई विधानसभा मतदार संघात यावेळेस तिरंगी लढत

वाई विधानसभा मतदार संघात यावेळेस तिरंगी लढत

सातारा (अली मुजावर )वाई विधानसभा मतदार संघात यावेळेस तिरंगी लढत पहायला मिळनार आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांनी देखील उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.अपक्ष म्हणून पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांनी देखील आपला अर्ज दाखल केला आहे.महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात आहेत.

आमदार मकरंद पाटील यांनी तीन वेळा वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक करत आमदारकी मिळवली आहे. मतदार संघात असणाऱ्या जनसंपर्क आणि विकास कामाचा डोंगर यामुळे आमदार मकरंद पाटील यांचे पारडे जड मानले जात आहे. मा.अरुणादेवी पिसाळ यांनी महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळवत कडवे आवाहन निर्माण केले आहे. मा.पुरुषोत्तम जाधव यांना महायुतीकडून अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात त्यांना मानणारा युवावर्ग असून निश्चितच यावेळी वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत दिसून येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket