Home » Uncategorized » क्राईम डायरी » वाई तालुक्यातील ओझर्डे आणी कदमवाडी येथे तरुणांच्या जागृते मुळे घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न .

वाई तालुक्यातील ओझर्डे आणी कदमवाडी येथे तरुणांच्या जागृते मुळे घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न .

वाई तालुक्यातील ओझर्डे आणी कदमवाडी येथे तरुणांच्या जागृते मुळे घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न .

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)वाई तालुक्यातील ओझर्डे गावासह कदमवाडी येथील स्वराज कॉलनीत अज्ञात चोरट्यांच्या टोळीने प्रवेश करुन दोन ठिकाणी घरफोडी करण्याचा मध्य रात्रीच्या दरम्यान प्रयत्न केला पण घरातील आणी घरा शेजारील लोक आणी तरुण वर्ग जागा झाल्याने चोरट्यांचा घरफोडी करण्याचा उद्देश सफल होवु शकला नाही .

सविस्तर वृत्त असे कि ओझर्डे ता . वाई येथील रहिवासी असलेले भैरू पांडक‌‌र (पाटावरील ) यांच्या घरावर मध्य रात्री दिड   वाजण्याच्या सुमारास अज्ञात ३ चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला त्याच दरम्यान घरात झोपलेली माणसं जागी झाली आणी खिडकीतून चोर चोर म्हणुन आरडा ओरडा केल्याने शेजारील राहणारे अंदाजे ५० जण   जागे झाले आणी त्यांनी हातात काठ्या घेऊन पांडकर यांच्या घराकडे धाव घेतली माणस आपल्या दिशेने येतायेत हे चोरट्यांच्या लक्षात आल्यावर चोरटे पळु लागले  त्यांचा पाठलाग येथील तरुणांनी केला पण अंधाराचा फायदा घेऊन ते लगतच्या ऊसात  घुसल्याने चोरटे निसटले. 

चोरट्यांचा  ओझर्डे गावातील घरफोडीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांनी आपला मोर्चा ओझर्डे गावा पासुन एक कि .मी . अंतरावर असणाऱ्या कदमवाडी येथील स्वराज कॉलनी कडे वळवुन तेथील भिसे यांचे घर मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न सुरू केला पण तेथेही घरातील व घरा शेजारील माणसे जागी झाल्याने तेथुन चोरट्यांनी पळ काढला . पण चोरट्यांनी घरफोडी करण्या साठी लागणारे आणलेले कटर एक लोखंडी रॉड इत्यादी साहित्य व कपड्यांची बेग पायातील तिघांच्या चप्पल एका टावेलला बांधून रस्त्या कडेच्या एका शेतात टाकुन पळुन गेले .

या गंभीर घटनेची माहिती गावचे पोलिस पाटील मच्छिंद्र कोदे  यांनी भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे यांना दिली त्यांनी तातडीने रात्र गस्तीवर असलेल्या दोन पोलिस गाड्या घटनास्थळी पाठवल्या त्यातील पोलिसांनी चोरटे पसार झालेल्या दिशेने ग्रामस्थांनच्या मदतीने शोध मोहीम राबविली पण दुर्दैवाने ति मोहीम अयशस्वी ठरली . आणी चोरटे पळुन जाण्यास यशस्वी झाले . अशा चोरट्यांचा. कायम स्वरुपी बंदोबस्त करण्या साठी भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे व त्यांचे सहकारी अधिकारी आणी पोलिस कर्मचारी नवीन दिशा ठरविण्याच्या मनस्थितीत आहेत . पण या गंभीर घटने मुळे ओझर्डे गावांसह कदमवाडी येथील ग्रामस्थांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .हे तितकेच खरे आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket