जय सोशल फाउंडेशन तर्फे शाहूनगर मधील स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी निवेदन
सातारा प्रतिनिधी- शाहूनगर भागामध्ये बऱ्याच कॉलनीमधील स्ट्रीट लाईट बंद आहेत. सध्या शाहूनगर भागामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे रात्री च्या वेळी घराबाहेर पडण्यासाठी नागरिक घाबरत आहेत. नुकतेच शाहूनगर मधील एका घरामधून बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आहे. या सर्व घटना ंचा विचार करता शाहूनगर भागामध्ये बंद असलेल्या स्ट्रीट लाईट लवकरात लवकर चालू करण्यासाठी जय सोशल फाउंडेशन तर्फे उपाध्यक्ष सतीश यादव यांच्यातर्फे सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. बापट यांना निवेदन देण्यात आले.
बापट साहेबांनी त्यास सकारात्मक प्रतिक्रिया देत स्ट्रीट लाईट लवकरात लवकर बसवण्याची आश्वासन दिले आहे. जय सोशल फाउंडेशनने शाहूनगर मधील अनेक सामाजिक उपक्रमामध्ये शाहूनगरवासियांच्या समस्या सोडविल्या आहेत.
