Post Views: 49
सातारा (अली मुजावर )-याबाबतची माहिती अशी की पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तासवडे टोल नाका येथे एक जण पायाने ड्रायव्हिंग करत असल्याचे कराड येथील सजग नागरिक खुस्पे सर यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी सदर गाडीचा पाठपुरावा करत तासवडे टोल नाका येथे ड्रायव्हरच्या पराक्रमाची पोलीस प्रशासनाला माहिती दिली. तासवडे टोल नाका ते कराड महामार्गावर विस्तारी करणाचे काम चालू असल्याने प्रचंड प्रमाणात वाहनांची गर्दी असते. अशावेळी चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग केल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. सदर गाडीत प्रवास करत असताना पाठीमागे पोलीस प्रशासनातील व्यक्ती बसल्याचे निदर्शनास आले. सदर वाहनावरती प्रशासन कारवाई करणार का त्याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.
