कचरामुक्त वर्धनगड ’वर्धनी माता मंदीर परिसर उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम नवीन शिक्षक भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवावी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षण सभापतींना निवेदन बिरवाडी गावचे सुपुत्र प्रा. श्रीकांत घाडगे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पुण्यात भव्य गौरव! पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मध्ये शासकिय कॉम्प्युटर व तांत्रिक कोर्सेस ना 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देणे सुरू  SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे
Home » राज्य » शिक्षण » बिरवाडी गावचे सुपुत्र प्रा. श्रीकांत घाडगे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पुण्यात भव्य गौरव!

बिरवाडी गावचे सुपुत्र प्रा. श्रीकांत घाडगे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पुण्यात भव्य गौरव!

बिरवाडी गावचे सुपुत्र प्रा. श्रीकांत घाडगे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पुण्यात भव्य गौरव!

महाबळेश्वर (प्रतिनिधी):शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण, उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल पुणे येथील नामांकित ‘ग्लोबल एलिट (मीडिया अँड टेक)’ संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’ (National Teacher Award) बिरवाडीचे सुपुत्र प्रा. श्रीकांत तुकाराम घाडगे यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

​रविवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथील विमाननगर परिसरातील सिम्बायोसिस महाविद्यालयात आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ‘ग्लोबल एलिट’ संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते प्रा. श्रीकांत घाडगे यांना हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार सुपूर्द करण्यात आला.

शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान

‘ग्लोबल एलिट (मीडिया अँड टेक)’ संस्थेच्या वतीने दरवर्षी संपूर्ण भारतातील गुणवंत व ध्येयवादी शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेतली जाते. प्रा. श्रीकांत घाडगे यांनी शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, अध्यापनातील नावीन्य आणि सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील योगदान विचारात घेऊन त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

बिरवाडीसह परिसरात आनंदाचे वातावरण

प्रा. श्रीकांत घाडगे यांनी मिळवलेल्या या उत्तुंग आणि अभिमानास्पद यशामुळे त्यांच्या मूळ गावी म्हणजेच बिरवाडीसह संपूर्ण परिसरात अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले आहे. “बिरवाडीचे सुपुत्र प्रा. श्रीकांत घाडगे यांनी राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या यशामुळे आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी व्यक्त करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

​प्रा.श्रीकांत यांच्या हातून शैक्षणिक क्षेत्रात असेच निरंतर आणि प्रेरणादायी कार्य घडो, तसेच त्यांच्या आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशा शब्दांत श्री काळभैरव आणि आई रामवरदायिनीच्या चरणी प्रार्थना करत सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कचरामुक्त वर्धनगड ’वर्धनी माता मंदीर परिसर उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम

‘कचरामुक्त वर्धनगड ’वर्धनी माता मंदीर परिसर उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम पुसेगाव : वनविभाग सातारा यांच्या वतीने ‘कचरामुक्त वर्धनगड ’ या

Live Cricket