पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मध्ये शासकिय कॉम्प्युटर व तांत्रिक कोर्सेस ना 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देणे सुरू  SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे सातारा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रान्सफॉर्मर चोरीची टोळी जेरबंद, १६ गुन्हे उघडकीस पाचगणीत आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम ; नितीन वन्ने यांचे उपस्थितीचे आवाहन गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील कामांना नव्या ‘टाइमलाईन’ने गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद

SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद

SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद

सातारा- विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी, 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील तब्बल 26 लाख 51 हजार 347 मतदारांपैकी 3 लाख 41 हजार 925 मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त झाले नसून, त्यांची ‘Uncollectable EF’ या प्रवर्गात नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

SIR मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील मतदारांच्या घरोघरी जाऊन गणना प्रपत्र देणे, ते भरून घेणे आणि मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत जिल्ह्यातील 23 लाख 9 हजार 422 मतदारांचे (87.10 टक्के) गणना प्रपत्र भरून व स्वाक्षरी करून प्राप्त झाले आहेत. उर्वरित 3 लाख 41 हजार 925 (12.90 टक्के) मतदारांच्या बाबतीत गृहभेटीनंतर गणना प्रपत्र प्राप्त झाले नसल्याचे आढळून आले.

या ‘Uncollectable EF’ प्रवर्गातील मतदारांची वर्गवारी लक्षवेधी आहे. त्यामध्ये 1 लाख 91 हजार 383 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ 88 हजार 490 मृत मतदार, 34 हजार 905 अन्यत्र नोंदणी झालेले अथवा दुबार नोंद असलेले मतदार आणि 26 हजार 326 सापडू न शकलेले किंवा गृहभेटीवेळी गैरहजर असलेले मतदार आहेत. अन्य कारणांमुळे 821 मतदारांचा समावेश ‘इतर’ प्रवर्गात करण्यात आला आहे.

मात्र, या नोंदींचा अर्थ संबंधित मतदारांची नावे अंतिमतः मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, असा होत नाही. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित नागरिकांना दावा, हरकत आणि दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाईने निष्कर्ष न काढता प्रारूप मतदार यादी तपासणे महत्त्वाचे आहे.

जिल्हा प्रशासनाने SIR प्रक्रियेत सापडू न शकलेले/गैरहजर (Absent), कायमस्वरूपी स्थलांतरित (Permanently Shifted), मृत (Dead) आणि अन्यत्र नोंदणी झालेले/दुबार (Duplicate/Already Enrolled) अशा ASDD मतदारांच्या याद्याही उपलब्ध करून दिल्या आहेत. या याद्या सातारा जिल्हा प्रशासनाच्या NIC संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. तसेच प्रारूप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तहसील कार्यालय, मतदार नोंदणी कार्यालय आणि संबंधित BLO यांच्याकडेही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रारूप यादीत नाव नसल्यास संबंधित नागरिकांनी प्रपत्र क्रमांक 6 भरून मतदार नोंदणी करता येईल. एखाद्या नावाबाबत आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक 7, तर मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी प्रपत्र क्रमांक 8 भरता येईल.

दावे व हरकती 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. प्रपत्र क्रमांक 6, 7 आणि 8 ऑनलाइन भरण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या Voters’ Service Portal चा वापर करता येईल.

दरम्यान, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे, तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करता येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासून पाहावेत. नाव नसल्यास किंवा नोंदीमध्ये त्रुटी असल्यास निर्धारित मुदतीत दावा, हरकत किंवा दुरुस्ती अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मध्ये शासकिय कॉम्प्युटर व तांत्रिक कोर्सेस ना 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देणे सुरू 

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मध्ये शासकिय कॉम्प्युटर व तांत्रिक कोर्सेस ना 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देणे सुरू  सातारा – पाटील इलेक्ट्रॉनिक्स

Live Cricket