पाचगणीत आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम ; नितीन वन्ने यांचे उपस्थितीचे आवाहन गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील कामांना नव्या ‘टाइमलाईन’ने गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत महाबळेश्वरात ‘आपला दवाखाना’ उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबिर; शासकीय योजनांच्या जनजागृतीसह प्राथमिक तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा दहिवडी पोलीस स्टेशन अंतर्गत ५४ गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विद्यार्थ्यांवर हिंदीची सक्ती करू नये-राहुल पवार

विद्यार्थ्यांवर हिंदीची सक्ती करू नये-राहुल पवार

विद्यार्थ्यांवर हिंदीची सक्ती करू नये-राहुल पवार

आदरणीय राज साहेब ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या संदर्भात दिलेले पत्र यावेळी सातारा शहरातील विविध शाळांना देण्यात आले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात पहिलीपासून हिंदी विषय तृतीय भाषा म्हणून शिकवण्याच्या शैक्षणिक धोरणाचा विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले की, ‘हिंदीची सक्ती मनसे खपवून घेणार नाही. शाळांमध्ये ही भाषा शिकवून दिली जाणार नाही.’माझं पत्र आता शाळांना जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला हा निर्णय मागे घेऊ असं सांगितलं होतं. 

आज मी तिसरं पत्र लिहिलं आहे.हिंदी भाषा का लादण्याचा प्रयत्न आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. मुळात सरकारकडून हे सगळं लादलं का जातं आहे? हा माझा प्रश्न आहे. माझी पत्रकार परिषद महाराष्ट्रासाठी, पालकांसाठी, मुलांसाठी, शिक्षकांसाठी, शाळांसाठी आहे. महाराष्ट्राच्या शाळांना हे मान्य आहे का? सरकारला हे कोणतं धोरण आहे ते मला समजलेलं नाही. भाषावर प्रांतरचना झाली आहे तर मग हे भाषा लादण्याचं कारण काय? पत्रकार म्हणून तुम्ही, साहित्यिकांनी, लेखकांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारला गेला पाहिजे. हा विषय आज लादला गेला तर नजिकच्या काळात मराठीचं अस्तित्व हे संपवून टाकतील. जेवढा या हिंदी सक्तीला विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे. शाळा हिंदी भाषा कशी शिकवतात तेच आम्ही बघू. महाराष्ट्र सरकारला हे आव्हान वाटत असेल तर आव्हान असंही राज ठाकरे म्हणाले.

पत्रकार परिषदेच्या वेळी राज ठाकरेनी तिसरे पत्र हे महाराष्ट्रातील सर्व शाळांना देणार असल्याचे सांगितले होते. त्या आदेशानुसार सातारा शहरातील विविध विद्यालयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराकडून पत्र देण्यात आले. सातारा शहरातील रयत शिक्षण संस्थेचे महाराजा सयाजीराव विद्यालय महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे कन्या शाळा तसेच अंनत इंग्लिश स्कूल या विविध विद्यालयातील मुख्याध्यापकांना आदरणीय राज साहेब ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या संदर्भात दिलेले पत्र पोहोच करण्यात आले. व संबंधित मुख्याध्यापकांना विनंती करून आपण विद्यार्थ्यांवर हिंदीची सक्ती करू नये अशी विनंती सातारा शहर अध्यक्ष राहुल पवार यांचे कडून करण्यात आली यावेळेस मनसेचे शहर उपाध्यक्ष भरत रावळ,आजार शेख मनसे जनधिकार सेना शहराध्यक्ष संदीप दुढले ओंकार साळुंखे इमरान शेख कार्तिक रावळ उपस्थित होते शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाचगणीत आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम ; नितीन वन्ने यांचे उपस्थितीचे आवाहन

पाचगणीत आज अण्णाभाऊ साठे जयंती; नितीन वन्ने यांचे उपस्थितीचे आवाहन पाचगणी : महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल व महाराष्ट्र प्रदेश

Live Cricket