साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे साताऱ्यात दक्षता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा एकमेकांशी डोकीफोड! नेत्यांचे जमले, कार्यकर्त्यांचे फाटले! जिल्हा बँकेच्या राजकारणात निष्ठावंतांची फसवणूक? वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत अर्णवी वन्नेचा १९ वा वाढदिवस उत्साहात साजरा! ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा ५ नोव्हेंबरला कोल्हापूर पीएफ कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये मायक्रो-प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन

सातारा प्रतिनिधी -व्यापारी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा स्थापना “गुढी पाडवा” १७ मार्च १९९१ पासून संस्थेच्या सभासदांच्या अर्थविषयक गरजा भागवीत असतानाच विविध सामाजिक उपक्रमांना अर्थसहाय्य करीत असते.

तसेच स्वतः सुध्दा समाजहिताचे उपक्रम राबवीत असते. कडाडलेल्या महागाईत नागरीकांना माफक दरातील दिवाळी फराळातील लाडू, चिवडा मिळावा यासाठी येथील “व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या” वतीने सलग २२ व्या वर्षी “व्यापारी लाडू चिवडा महोत्सव” आयोजित केला आहे. सदर उपक्रम हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुप्रसाद सारडा यांच्या संकल्पनेतून २२ व्या वर्षीही सातारा लाडू चिवडा महोत्सव चालू ठेवण्यात आला आहे.

सदर महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांचे हस्ते करण्यात येत आहे.पतसंस्थेच्या वतीने गेली २१ वर्षे हा महोत्सव आयोजित केला जातो, त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. लाडू व चिवडा तयार करण्यासाठी बेसन, तेल, साखर, शेंगदाणे, पोहे, चुरमुरे दर्जेदार वापरले जातात, याबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. हा लाडू चिवडा महोत्सव “ना नफा ना तोटा” या तत्वावर नागरिकांना देण्यात येणार आहे. असे श्री.पिलके यांनी सांगितले. या वर्षी मजूरी, इंधन, लागणारा कच्चा माल यामध्ये अधिक वाढ झाली आहे असे असतानासुद्धा चिवडा केवळ रु.२३०/- व लाडू रु.२३०/-प्रती किलो या दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यंदाचा लाडू चिवडा महोत्सव मंगळवार दिनांक ०३/११/२०२६ ते १२/११/२०२६ या दहा दिवसाचे कालावधी मध्ये सुरु ठेवण्यात येणार आहे. श्री. प्रभाकर राऊत मिळाईवाले, मल्हार पेठ, सातारा येथे आयोजित केला असून लाडू, चिवडा विक्रीची संपूर्ण व्यवस्था “श्री. भरतशेठ राऊत, राऊत मिठाईवाले” यांचेकडेच करणेत आली आहे. तरी या उपक्रमास सातारकरांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन श्री. दिलीप पिलके यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप

Live Cricket