साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे साताऱ्यात दक्षता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा एकमेकांशी डोकीफोड! नेत्यांचे जमले, कार्यकर्त्यांचे फाटले! जिल्हा बँकेच्या राजकारणात निष्ठावंतांची फसवणूक? वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत अर्णवी वन्नेचा १९ वा वाढदिवस उत्साहात साजरा! ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा ५ नोव्हेंबरला कोल्हापूर पीएफ कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये मायक्रो-प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे साताऱ्यात दक्षता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे साताऱ्यात दक्षता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे साताऱ्यात दक्षता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा

सातारा -भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मिती, प्रशासकीय पारदर्शकता आणि कामकाजातील सचोटीची मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या सातारा झोनल कार्यालयाच्यावतीने दक्षता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. 

दक्षता जागरूकता सप्ताह हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून दैनंदिन कामकाजात प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्याची जाणीव दृढ करणारा उपक्रम आहे. बँकिंग क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास ही सर्वांत मोठी संपत्ती मानली जाते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे, नियमांचे काटेकोर पालन करणे, जबाबदारीने सेवा देणे आणि भ्रष्टाचाराला कोणत्याही स्वरूपात थारा न देणे, या मूल्यांना विशेष महत्त्व आहे.

दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह साजरा केला जात आहे. ‘सत्यनिष्ठा से समृद्धि’ (Probity for Prosperity) ही या वर्षाची संकल्पना असून, प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या माध्यमातून समृद्ध व विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करण्याचा संदेश यातून दिला जात आहे. 

बँकिंग क्षेत्रात ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता, सेवांमधील पारदर्शकता आणि नियमाधारित कार्यपद्धती यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.सचोटी ही केवळ जबाबदारी नसून विश्वासार्ह बँकिंग व्यवस्थेचा पाया आहे, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.भ्रष्टाचारमुक्त कारभार, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा संदेश देत जनजागृती रॅली

मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी जनजागृती रॅली आयोजित केलि. यावेळी पत्रकांच्या माध्यमातून असणाऱ्या घोषवाक्यचे शपथपूर्वक वाचन सर्वांनी केले. या माध्यमातून प्रामाणिकपणा, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीचा संदेश देण्यात आला. 

महिलांसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीर

दिनांक ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले या कार्यक्रमासाठी श्री. तुषार वरांडे सेंट्रल कमांडर गृह रक्षक दल सातारा व त्यांची प्रशिक्षित पथक यांनी महिलांना आत्मसंरक्षणचे प्रशिक्षण दिले. 

सायबर सुरक्षा जागरूकता शिबीर

दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२६ रोजी सायबर क्राईम पोलीस डिपार्टमेन्ट सातारा येथे कार्यरत असलेल्या श्रीमती श्रद्धा माने व श्री राजेश घाड़गे यांनी सायबर सुरक्षेविषयी माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या व्यतिरिक्त सातारा अंचल विभागाने कर्मचा-यांसाठी प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम देखील आयोजीत केला होता व सातारा जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखांच्या माध्यमातून शाळा, कॉलेज मध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले. ग्राहकांना देखील सतर्कते बद्दल माहिती दिली व तक्रार निवारण शिबीर आयोजीत केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन

Live Cricket