वाईत मान्सून पुर्व आढावा बैठक संपन्न
सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुखांना सोबत घेवुन मान्सूनचा मुकाबला करणार -तहसीलदार सोनाली मेटकरी
वाई प्रतिनिधी: येणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या अध्यक्षते खाली वाई पंचायत समिती मधील किसनवीर सभागृहात सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी निवासी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे सहाय्यक बिडीओ शांताराम गोळे हे ऊपस्थित होते .
या वेळी सर्व कार्यालयीन प्रमुखांनी येणाऱ्या पावसाळ्यात लहरी निसर्गाच्या विविध प्रकारच्या आव्हानांना व आयत्या वेळी निर्माण होणाऱ्या अडचणींचा यशस्वी पणे एकत्रीत पणे सामना करण्यासाठी मान्सून पुर्व प्रत्येक विभागांनी केलेल्या नियोजनाची या वेळी बारकाइने पाहणी करुन समाधान व्यक्त केले .
केलेले हे नियोजन अप्रतिम आहेच पण हे नियोजन कागदावर न राहता पावसाळ्यात गावा गावांनवर अचानक पणे येणाऱ्या संकटांच्या काळात सामना करण्या साठी कृतीतून दाखवण्याची जबाबदारी प्रत्येक खाते प्रमुखांनी जबाबदारीची जाणीव ठेवुन स्विकारली पाहिजे असे आवाहन तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले आहे .
बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या वाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यानी पावसाळ्या पुर्वी गरोदरमाता यांचे गावो गावच्या ग्रामपंचायत स्तरावर आशा आणी अंगणवाडी सेविका मार्फत सर्वे करुन त्यांना नैसर्गिक आपत्ती कालावधीत सुरक्षित ठिकाणी पोहोचवुन प्रथमोपचार देण्या साठी नियोजन करावे .
आरोग्य विभागाने तालुक्यात असणाऱ्या ४ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मान्सून पुर्व पिण्याच्या पाण्यांचे नमुने तपसावेत.तसेच संभाव्य आपत्ती ग्रस्त गावांन साठी औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध करुन ठेवावा . व तो नैसर्गिक आपत्ती कालावधीत प्रथमोपचार व औषधसाठा गावांना पोहच करण्याची जबाबदारी घ्यावी .तसा आराखडा तयार करावा .कार्यकारी अभियंता धोमबलकवडी यांनी मान्सून कालावधी चालु होण्या पुर्वी धरणा वरील सर्व यंत्रणा तांत्रीक दृष्ट्या दुरुस्त करुन घ्यायच्या आहेत .
सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्सून सुरु होण्या पुर्वी सर्व रस्त्यांचे दुरुस्तीचे काम पुर्ण करावे व पुलाखाली अडकलेला कचरा काढून पुल मोकळा करावा जेणे करुन मान्सून कालावधीत अतिवृष्टी झाल्यास पुला खालून पाणी वेगाने जाईल .ऊप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांनी मान्सून चालु होण्या पुर्वी पाणी पुरवठा पाईप लाईन यांच्या तपासण्या करुन खराब झालेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करून घ्यावी विषेशतः मान्सून कालावधीत पश्चिम भागातील पाणी पुरवठा सुरळीत व स्वच्छ चालु राहील याची दक्षता घ्यावी .वाई भुईंज पोलिस अधिकाऱ्यांनी पावसाळ्या पुर्वी पोलिस पाटीलांच्याबैठका घेवुन मान्सून कालावधीत करावयाच्या कामा बाबत सुचना देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे .
विध्दुत वितरणने पावसाळ्या पुर्वी वाई तालुक्यातील सर्व ऊप केंद्रातील ट्रांन्सफार्मर यांची दुरुस्ती करून ऊच्चदाब व लघुदाब वाहिण्या यांची तपासणी करुन त्या दुरुस्त करण्यात याव्यात . तसेच धरणातुन पाण्याचा विसर्ग होत असताना पाण्यात बुडणाऱ्या डिपीचा
विद्युत पुरवठा बंद करावा .
मुख्याधिकारी वाई नगर परिषद यांनी वाई शहराच्या नदी पात्रा कडेची व धोकादायक घरे वाडे आणी इतर इमारती यांना मान्सून पुर्व नोटीसा देण्यात याव्यात .आगार व्यवस्थापक यांनी नैसर्गिक आपत्ती कालावधी मध्ये पुर परस्थीती पाहुन वाहनांचे व मार्गांचे नियोजन करावे .या कालावधीत गळक्या बसेसचा वापर करु नये .
वाई ग्रामीण रुग्णालय यांनी मान्सून कालावधीत २४ तास वैद्यकिय आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु ठेवावेत .अशा विविध प्रकारच्या आवश्यक सुचना आढावा बैठकीत वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिल्या आहेत .सर्व विभागाच्या प्रमुखांनी दिलेल्या सुचनांचे पालन न केल्यास पुढे कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही तहसीलदार यांनी मार्गदर्शन करताना दिला आहे .