केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांची सातारा जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्पाबाबत खासदार नितीनकाका पाटील यांनी घेतली भेट
प्रतिनिधी -खा.नितिनकाका पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची सातारा जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्पाबाबत सकारात्मक दिल्ली भेटी चर्चा करण्यात आली.सातारा जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्याबरोबरच विकासात्मक गोष्टीवर चर्चा करण्यात आली.सातारा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मा. नितीनजी गडकरी यांच्या दूरदृष्टीमुळे मार्गी लागले आहेत. यावेळी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग विकास आणि स्थानिक लोकभावना यांचा विचार करून अपेक्षित कामकाजाची मागणी यावेळी खासदार नितीन काका पाटील यांनी केली. नामदार नितीनजी गडकरी यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.
खासदार नितीनकाका पाटील यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासात्मक आवश्यकतेवर भर दिला असून. भाजपचा सहयोगी पक्ष असणाऱ्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या विविध बाबीसाठी त्यांचा आग्रह असतो.
सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अशीच भक्कम पावले उचलत राहण्याचा मानस खा.नितीनकाका पाटील यांनी केला आहे.