नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » ठळक बातम्या » फलटणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा पालखी मार्गांचे आधुनिकीकरण अंतिम टप्प्यात; दिवेघाट एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण

फलटणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा पालखी मार्गांचे आधुनिकीकरण अंतिम टप्प्यात; दिवेघाट एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण

फलटणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा पालखी मार्गांचे आधुनिकीकरण अंतिम टप्प्यात; दिवेघाट एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण

भारतभूमीच्या सनातन परंपरेत, वारकरी संप्रदायाची ही पदयात्रा श्रद्धा, तपस्या आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. दरवर्षी, आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी संतांच्या पालखीसमवेत पंढरपूर धामाकडे भगवान विठ्ठलांच्या दर्शनासाठी प्रस्थान करतात.

मात्र अनेक वर्षे ही पवित्र यात्रा विविध अडचणीला सामोरी जात होती यामध्ये प्रामुख्याने अरुंद रस्ते, वाढती रहदारी आणि विशेषतः दिवे घाटाचा अरुंद, कठीण व धोकादायक टप्पा, जो वारकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत होता.या सर्व समस्यांवर उपाय म्हणून, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून, तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोईची व प्रशस्त होणार आहे

संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग NH-965 संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र परंपरेशी जोडलेला हा मार्ग आळंदी ते पंढरपूर पुढे मोहळ ते वाखारी असा सुमारे 234 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे, हा पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामधून जातो. या प्रकल्पाची किंमत रु 7,625 कोटी असुन पूर्णत्वास जात आहे.

 या मार्गाचे बांधकाम 6 पॅकेजमध्ये भाग करण्यात येत आहे. त्यामध्ये

 (i) मोहोळ ते वाखरी, (ii) वाखरी ते खुडूस, (iii) खुडूस ते धरमपुरी, हडपसर. 

 (iv) धरमपुरी ते लोणंद, (v) लोणंद ते दिवे घाट आणि (vi) दिवे घाट ते

यापैकी 4 पॅकेज पूर्ण झाले आहेत धरमपुरी ते लोणंद हे पूर्णत्वास (98%) झाले असुन दिवे घाट ते हडपसर या भागात सुमारे 65% काम झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे ते मार्च २०२७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

ह्या मार्गावरील सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर यांसारख्या महत्वाच्या गावांना Bypass देण्यात आले आहेत. जेणेकरून जड वाहतूक गावाच्या बाहेरून जाईल.

आता या मार्गाची चौपदरीकरण करताना वारकऱ्यासाठी स्वतंत्र लेन (Lane) ची तरतूद (3.5m दोन्ही बाजूस) केली आहे. त्यामुळे वारी ही अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होईल.विशेषतः दिवे घाट मध्ये रस्त्याची रुंदी २ वरून ४ लेनमध्ये वाढविण्यात येत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल.

 आवश्यक त्या ठिकाणी फ्लायओव्हर, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरपास आणि आधुनिक पुलांच्या माध्यमातून हा मार्ग अधिक सुगम झाला आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग NH-965G पाटस ते पंढरपूर असा सुमारे 130 किलोमीटर लांबीचा हा मार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो.

सुमारे 4,416 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेला हा मार्गही वारकऱ्यांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवून विकसित करण्यात आला आहे.

ही योजना 3 पॅकेजमध्ये विकसित केली जात आहे- पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले.

 यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून, इंदापूर ते तोंडले 96% आणि बारामती ते इंदापूर सुमारे 84% प्रगतीपथावर आहे. या पॅकेज मध्ये काही अडचणी होत्या तथापि, आता त्यातून मार्ग निघालेला आहे.

 हा मार्ग बारामती, बावडा, अकलूज आणि श्रीपूर यांसारख्या भागांना Bypass करून जलद आणि सुरक्षित करण्यात आला आहे (Bypass).

 या दोन्ही पालखी मार्गांचा विकास केवळ रस्ते बांधकामापुरता मर्यादित नसून, तो एक समग्र विकास मॉडेल म्हणून साकार झाला आहे.

जलसाठा निर्मिती

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग–संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम करताना सोलापूर व सातारा जिल्ह्यात NHAI द्वारे बुलढाणा पॅटर्न प्रमाणे जवळपास 43 तलावांचे खोलीकरण करुन 33.45 लक्ष माती / मुरुम महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आला. यामुळे 3345 TCM (Thousand Cubic Meter) इतका अतिरिक्त जलसंचय साठा निर्माण झाला. तसेच Water Table मध्ये वाढ झाली.

 संत तुकाराम महाराज पालखी मार्ग–महामार्गावरील परिसरातील जलसंधारण क्षमतेत वाढ करणे या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या विविध तलावांची निवड करुन त्यातील माती / मुरुम रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आली. परिणामी या परिसरातील विनामुल्य जलसाठे निर्माण झाले. जवळपास 25 तलावांचे खोलीकरण करुन 1925 TCM (Thousand Cubic Meter) इतका अतिरिक्त जलसाठा निर्माण करण्यात आला. त्यामुळे आसपासच्या सुमारे 25 गावांना याचा फायदा झाला आहे.या ठिकाणी मला आवर्जून स्वर्गीय अजितदादा पवार यांची आठवण येते. त्यांनी बारामतीच्या बायपासवर कान्हेरी गावाजवळ तलावाचे खोलीकरण करुन घेतले होते. त्यामध्ये NHAI च्या कामासाठी जवळपास 2 लाख क्यूबिक मटेरियल काढून वापरण्यात आले पुढे याचे खोलीकरण झाल्यावर तलावाचे Irrigation मधून Bund व काँक्रीटचा सांडवा तयार करुन घेतला.

 ट्रान्सप्लांटेशन रस्ते बांधकामा दरम्यान येणारी अंदाजे ४५०० झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच मार्गाच्या दोन्ही बाजूंनी व्यापक वृक्षारोपण करण्यात आले आहे. 

– नवीन plantation 4०,००० (चाळीसं हजार करण्यात आले आहे.

ऐतिहासिक स्थळांचे जतन

 महामार्गाचे बांधकाम करून इतिहास आणि परंपरेचा पूर्ण सन्मान राखण्यात आला आहे. त्यामुळे अहिल्या देवी विहीर आणि बाजीराव विहीर यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करून मार्गाची उभारणी करण्यात आली आहे.

 पालखी मार्गात वापरलेली nnovative Technology निरा राईट बँक चॅनल वर जो मोठा पूल आहे याचा स्पॅन 102.6 मीटर हा single span आहे. पूर्वी भारतात जास्त जास्त 30 ते 40 मीटर स्पॅन म्हणजे (2) Pier मधील अंतर), design केल्या जात असे तथापि, या technology द्वारा आपण 100 मीटर पर्यंत span design करु शकतो व मला वाटते भारतातील 100 span असलेला पुल असेल. हे काँक्रीट समस्या काँक्रीट च्या 4 पट मजबूत असते.

* यासाठी UHPFRC – Ultra High Performance Fibre Reinforced Concrete या नवीन प्रकारच्या काँक्रीट द्वारे हे काम केलेले आहे.

* यामध्ये स्टील / लोखंडी सळई ऐवजी steel fibres वापरले आहे. ही एक नवीन technology असून आम्ही भारतात प्रथम ही technology आणलेली आहे.

* संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर एकुण 13 पूलांच्या कामात आपण ही technology वापरलेली आहे. हे निश्चितच एक विशिष्ट पूर्ण बाब ठरते.

 अशा प्रकारे, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पवित्र परंपरेला आधुनिक पायाभूत सुविधांशी जोडत, हे पालखी मार्ग भक्ती, सुरक्षिता आणि विकास यांचा अद्भूत संगम साकारत आहेत.

घोषणा

दिवेघाट पूर्णत्वाचा दिनांक – एप्रिल २०२७

१. जेजुरी Flyover, लांबी-२किमी, किंमत २५० कोटी,

या पुलामुळे जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल व शहरातील अपघाताचे प्रमाण कमी होईल.

 २. फलटण शहर One Time Improvement-९७ कोटी मंजूर

 या कामाची निविदा प्रक्रिया सध्या चालू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. फलटण शहरातील अरुंद रस्त्याचे व राव रामोसे पुलाचे रुंदी करण झाल्यास शहरात वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच पालखी च्या वेळेस रुंद रस्ता असल्यामुळे वरकऱ्याना सोयस्कर होईल.

जुनी मागणी- लांबी ६.७ किमी (4 Lane)

 

* निरा रोड वरील ROB -७२ मी. (single span)

या ROB मुळे अखंडित असलेला रस्ता जोडला जाईल या मुळे सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

 

* ३. टेंभूर्णी-पंढरपूर (NH 561A) लांबी ४८ किमी किंमत ९५० कोटी (यात पंढरपूर बायपास लांबी ९.५० किमी समाविष्ट)

 

* ४. पंढरपूर पूर्ण रिंग रोड

* एकूण लांबी ४० किमी पैकी १३ किमी पूर्ण. 

९.५० किमी (टेंभूर्णी-पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित) शिर्डी अहिल्यानगर टेंभूर्णी कडून येणारी वाहतूक पंढरपूर शहरात प्रवेश न करता विजापूर मंगळवेढा मार्गे शहराबाहेरून जाईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल.

उर्वरित १८ किमी DPR हाती घेण्यात येईल. वाखरी ते अनवणि सातारा रोड, कराड रोड व सांगोळा रोड यांना क्रॉस करून मंगळवेढा रोडला मिळेल.त्यामुळे पुणे सातारा येथून येणारी अवजड वाहतूक शहरात प्रवेश न करता बाहेरून मंगळवेढा मार्गे विजायपूरला जाईल व शहरातील वाहतुकीचा तान कमी होईल .

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पंढरपूरला पूर्णपणे रिंग रोड उपलब्ध होईल, ज्यामुळे वारकरी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

* ५ . तोंडले या ठिकाणी दोन्ही पालखी मार्ग मिळतात. त्या ठिकाणी Flyover बांधणे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket