नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा
केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपासून (२९ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची सांगता शनिवार, ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
दरवर्षी नायगाव येथे पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यंदाही सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नायगावचे सरपंच नितीन धुमाळ यांनी केले आहे.




