शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन

जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन

जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन

केळघर : जावळी तालुक्यातील शासकीय कार्यालये व सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये स्वर्गीय हिंदुहृदयस‌म्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याबाबतचे निवेदन जि प सदस्या कविता ओंबळे यांनी जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले .

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक जीवनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक करण्याच्या दृष्टीने शासनाच्या नियमानुसार त्यांचा फोटो शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात यावा, अशी मागणी आहे. त्याअनुषंगाने पंचायत समिती जावळीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये तसेच जावळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अधिकृत फोटो सन्मानपूर्वक लावण्यात यावा, यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी.

तसेच सदर बाब शासनाच्या विद्यमान नियम, परिपत्रक व मार्गदर्शक सूचनांनुसार शक्य असल्यास सर्व संबंधित ग्रामपंचायतींना याबाबत आवश्यक सूचना मार्गदर्शन देण्यात यावे. असे जि प सदस्या सौ कविता ओंबळे यांनी निवेदनाव्दारे मागणी केली आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket