राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई
सातारा -खंडाळा पोलीस ठाणे हद्दित दिनांक २८.०८.२०२६ रोजी सकाळी ११.४५ वाचे सुमारास मौजे पारगांव ता खंडाळा गावचे हद्दीत सातारा पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर पारगांव स्टॉप ते शिंदेवाडी फाटा दरम्याने आम्ही पोलीस निरीक्षक एम.जे. जगताप आम्हाला गोपनीय बातमी दारामार्फत माहीती मिळाली कि, एक स्विफ्ट डिझायर गाडीतून अवैद्य चोरटी दारूची वाहतुक होणार नाही आहे. लागलीच पारगांव स्टॉप येथे स्टाफ पाठवून सदर गाडी ताब्यात घेणे बाबत आदेशीत केले.
अंमलदार यांनी सदर गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर गाडी न थांबता तशीच जोरात पुढे निघून गेली त्याबाबत आम्हास माहीती मिळाल्याने आम्ही शासकीय वाहनाने सदर गाडीचा पाठलाग केला व पुढे शिरवळ पोलीस स्टेशनचे पोउनि आंदेलवारं यांनी माहीती दिली त्यांनी शिंदेवाडी फाटा येथे अंमलदार पाठवून नाकाबंदी लावून इतर गाडीचे सहाय्याने सदरची गाडी ताब्यात घेतली त्याच वेळी सदर ठिकाणी आम्ही स्टाफ सह जावून सदर गाडी ताब्यात घेवून खंडाळा पोलीस स्टेशन येथे आलो असता त्यामधील इसमांची नावे विचारली असता सदर गाडी मध्ये चालक २) नितीन ज्ञानेश्वर शेळके वय ४० वर्षे मु.पो दोंदे ता खेड जि पुणे व प्रोव्ही मालाचे मालक १) सुनिल रामचंद्र कांबळे वय ६२ वर्षे रा.प्रज्वल रेसिडेन्सी दांगट गार्डन सिंहगड रोड वडगांव बुद्रुक पुणे असे दोघे असल्याचे निष्पन्न झाले सदर स्वीफ्ट डिझायर गाडी क्रमांक क्रमांक एम.एच.१४ जी यु ४५७३ मध्ये दोन पंचासमक्ष पाहणी केली त्यामध्ये एकूण १,१९,१६० रूपये किंमतीची विदेशी दारू व ५,००,०००/- रूपये किंमतीची पांढरे रंगाची स्वीफ्ट डिझायर कार मिळून आलेली आहे. त्यावरून खंडाळा पोलीस स्टेशनला गुरनं १६५/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई) ८३,९८ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असून गुन्हयाचा अधिक तपास सपोफौ नाना धायगुडे हे करीत आहेत.
सातारा जिल्हयात अवैद्य व्यवसायावर कारवाई करणे बाबत श्री. निखिल पिंगळे सो पोलीस अधिक्षक सातारा, मा.श्रीम. वैशाली कडुकर सोो. अपर पोलीस अधिक्षक सातारा मा श्री. रणजीत सावंत मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सठणे वडूज विभाग वडून पदभार फलटण विभाग यांनी सुचना दिल्या होत्या त्यांचे मार्गदर्शनाखाली श्री. एम.जे. जगताप पोलीस निरीक्षक खंडाळा पोलीस स्टेशन, पोउनि आंदेलवार शिरवळ पोलीस स्टेशन, सफौ धायगुडे, पोहवा ३९३ तांबे, पोकों ९८६ चव्हाण, पोकॉ १०२१ जाधव, पोकों ८१४ नेवसे, पोकों १७४५ गिते खंडाळा पोलीस स्टेशन, पोकॉ १३०७ अभंग, पोकॉ २६०९ बारळे शिरवळ पोलीस स्टेशन यांनी कारवाईत सहभाग घेतला.




