- संस्थापक स्व.आनंद कोल्हापुरे यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त उत्कर्ष च्या माध्यमातून वृक्षारोपण
दिनांक १० जून २०२४ रोजी संस्थापक स्व आनंद कोल्हापुरे यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त दरवर्षीच उत्कर्ष च्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाते. तसेच यावर्षी देखील संस्थेच्या सर्व शाखांच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करणे हि काळाची गरज असून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्कर्ष पतसंस्था हा उपक्रम गेले ८ वर्षे अविरत राबवीत आहे. याच दिवशी संस्थेच्या पाचवड शाखेचा ९ वा वर्धापन दिन असल्याने, यानिमित्ताने पाचवड येथील राजेश स्वामी अभ्यासिकेला विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन असणारी पुस्तके भेट देण्यात आली. तसेच स्व आनंद कोल्हापुरे यांच्या स्मरणार्थ सभासद बक्षिस पाल्य सोहळा देखील घेण्यात आला होता. या सोहळ्यात संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उत्तम यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थापक यांनी सुरु केलेला हा उपक्रम असाच अविरत सुरु ठेवणार असल्याचे अध्यक्ष श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद वाई व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री सचिन अशोकराव फरांदे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ वृषाली सचिन फरांदे यांनी भूषविले. शैक्षणिक क्षेत्रासोबातच विद्यार्थ्यांनी निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे असे मनोगत श्री सचिन फरांदे यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. तसेच या प्रसंगी, वाई ते केदारनाथ प्रवास सायकल वरून संपन्न करणाऱ्या श्री वरुण सुनील गोंजारी यांचा या सहसाप्रती विशेष सत्कार उत्कर्ष परिवारातर्फे करण्यात आला.
सायकलवरून केलेला हा २००० किलोमीटर चा प्रवास हा सोशल मेडीयावर पोस्ट साठी नाही तर पाहिलेल स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी केला होता, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने रील्स च्या दुनियेतून बाहेर पडून रियल दुनियेकडे डोळे उघडे ठेवून पहा म्हणजे तुम्ही पाहिलेल स्वप्न नक्कीच सत्यात उतरेल असे मत श्री वरुण गोंजारी यांनी व्यक्त केले. तब्बल १०० विद्यार्थ्यांचा सन्मान अतिथींच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक श्री मदनकुमार साळवेकर व आभार श्री भूषण तारू यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, उपाध्यक्ष ऍड. श्री रमेश यादव, संचालक श्री अमर कोल्हापुरे, श्री मदन साळवेकर , डॉ मंगला अहिवळे , श्री श्रीकांत शिंदे , श्री शरद चव्हाण , श्री सालीमभाई बागवान, श्री संजय वाईकर , श्री सागर मुळे , श्री वैभव फुले , श्री भूषण तारू, श्रीमती नीला कुलकर्णी, श्रीमती अलका घाडगे हे उपस्थित होते. तसेच वृक्षारोपण प्रसंगी संस्थेचे सभासद श्री.जयवंत(आबा)पवार,श्री. बाळकृष्ण वाघ, श्री.राहुल तांबोळी, अनिल बापू गायकवाड यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.