Home » राज्य » शिक्षण » सयाजी शिंदे यांच्या हस्ते भर पावसात वृक्षारोपण संपन्न हिन्दुस्तान फीड्स, युनिव्हर्सल नॉलेज स्कूलतर्फे जाधववाडी येथे आयोजन

सयाजी शिंदे यांच्या हस्ते भर पावसात वृक्षारोपण संपन्न हिन्दुस्तान फीड्स, युनिव्हर्सल नॉलेज स्कूलतर्फे जाधववाडी येथे आयोजन

सयाजी शिंदे यांच्या हस्ते भर पावसात वृक्षारोपण संपन्न हिन्दुस्तान फीड्स, युनिव्हर्सल नॉलेज स्कूलतर्फे जाधववाडी येथे आयोजन

विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग. 

 सातारा/ प्रतिनिधी : येथील हिन्दुस्तान फीड्स, युनिव्हर्सल नॉलेज स्कूलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते जाधववाडी (ता. सातारा) येथे नुकताच वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला. हिन्दुस्तान फीड्स परिवारातील मान्यवर व सदस्य तसेच युनिव्हर्सल नॉलेज स्कूलच्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसह जाधववाडी येथील ग्रामस्थांच्या सहभागातून अपूर्व उत्साहात भर पावसात हे वृक्षारोपण संपन्न झाले. यावेळी यापूर्वी लावलेल्या झाडांचे वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला.                    

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून हिन्दुस्तान फीड्सतर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने होत असलेल्या या उपक्रमात युनिव्हर्सल नॉलेज स्कूलचाही उत्स्फूर्त सहभाग असतो. यंदाच्या वृक्षारोपण समारंभास सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे व रेंज फॉरेस्ट ऑफिसर अभिजीत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम जाधववाडी येथील शिवारात संपन्न झाला.            

हिन्दुस्तान फीड्स व युनिव्हर्सल नॉलेज स्कूल यांनी पर्यावरण रक्षणासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी कौतुक केले व झाडे लावा, झाडे जगवा या संदेशाद्वारे तसेच त्यांच्या माध्यमातून सह्याद्री वनराई या प्रकल्पाद्वारे राबवण्यात असलेल्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमाची माहिती दिली. केवळ झाडेच माणसासह अन्य सजिवांच्या सुखी आणि आरोग्यमय जीवनाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे झाडे लावून ती जगूया, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. सर्वांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी पर्यावरण समतोलासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावूया व पुढील पिढीसमोरील भीषण संकट दूर करण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन केले. दरम्यान, पंढरपूरची वारी व वृक्षारोपण याबाबत त्यांनी कविताही सादर केली. त्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.                

        यावेळी सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनीही वृक्षारोपणाच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून झाडे हा पृथ्वीचा श्वास आहे, ती जपली पाहिजेत, तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असे मत मांडले. तसेच ठिकठिकाणीच्या वृक्षारोपणासाठी वनविभागातर्फे रोपांची उपलब्धता करून देऊ, असेही सांगितले. अनुपमा वज्रकांत यांनी वणवा लागू नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. कारण वणव्यामध्ये वृक्षराजीबरोबरच गवत, जीवजंतू व वनौषधी नष्ट होतात, असे सांगितले. तसेच झाडांची मुळे जमिनीत पाण्याचा साठा करून ठेवतात. व त्याचा फायदा लगतच्या परिसरास होतो अशी माहितीही दिली. गतवर्षी लावलेल्या झाडांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली व उत्तम संगोपणाबद्दल समाधान व्यक्त केले.

  जाधववाडीचे सरपंच सुनील भारती, उपसरपंच दत्तात्रय पवार, जाधववाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन कल्याण पवार, माजी सैनिक कृष्णात जगताप, ग्रामस्थ सुनील केंजळे, दीपक केंजळे, अमर तोरस्कर आदींनीही वृक्षारोपणात सहभाग घेतला व विविध झाडांची लागण केली. वृक्षारोपण समारंभाचे औचित्य साधून युनिव्हर्सल नॉलेज स्कूलमधील विद्यार्थ्यांनी “पाणी वाचवा, मानव जगवा” हे नाटुकले व दिंडी सोहळ्याचे प्रात्यक्षिक सादर केले. बालचमूंच्या या कलाकृतीचे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले.                

यावेळी हिन्दुस्तान फीड्सतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमाबद्दल वनविभाग, पालक, जाधववाडीचे सरपंच व ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket