कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांचे हस्ते कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सैदापूर येथील नव्याने हस्तांतरित जमिनीचे भूमीपूजन गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सरांच्या मातोश्रीं कमल मुरलीधर काटेकर (वय वर्ष ७७) यांचे निधन (पाचवड) ते चिंधवली ते भिवडी रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी समलिंगी व्यक्तींनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार – मा.किशोर बेडकीहाळ  शिक्षक बँकेच्या वाटचालीत सेवकांचे योगदान मोलाचे श्री किरण यादव दीपलक्ष्मी पतसंस्था व पुस्तक पर्व ग्रंथ भांडार आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्री     
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » कर्मवीरांचे आयुष्य व विचार पुढील पिढ्यांना प्रेरणादायी 

कर्मवीरांचे आयुष्य व विचार पुढील पिढ्यांना प्रेरणादायी 

कर्मवीरांचे आयुष्य व विचार पुढील पिढ्यांना प्रेरणादायी 

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातपात भेद विरहित शिक्षण व्यवस्था निर्माण करून गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यांचे आयुष्य व विचार पुढील अनेक पिढ्याना प्रेरणादायी ठरतील असे विचार जेष्ठ सामाजिक विचारवंत शिवाजी राऊत यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. कर्मवीर अण्णांचे विचार त्यांचे शैक्षणिक तत्वज्ञान, श्रमप्रतिष्ठा, ज्ञानरचनावाद, सामाजिक निष्ठा, सत्यशोधक विचारांचा आदर्श, शैक्षणिक क्षेत्रातील त्यागी व निस्पृह आयुष्य या विविध अंगाचा आढावा त्यांनी घेतला.

           यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. मनोहर निकम यांनी केले. अण्णांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी माहिती देऊन कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा परिचय त्यांनी करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर विभागाचे सहसचिव डॉ. राजेंद्र मोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. शरद ठोकळे यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. धनाजी मासाळ यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. विकास येलमार, डॉ. डी. डी. कोरडे, प्रा. कबीर वाघमारे, प्रा. एम.डी. चिंदे,प्रा. आर.जे. लोखंडे, प्रा. निलेश जमदाडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनमोल सहकार्य केले.प्रा.डॉ.सीमा कदम व विद्यार्थिनी प्रीती वाघमारे, श्रावणी झांजुर्णे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांचे हस्ते कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सैदापूर येथील नव्याने हस्तांतरित जमिनीचे भूमीपूजन

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचे हस्ते कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सैदापूर येथील नव्याने हस्तांतरित जमिनीचे भूमीपूजन  कराड -महात्मा

Live Cricket