Home » राज्य » शिक्षण » महाबळेश्वरमध्ये तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न

महाबळेश्वरमध्ये तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न

महाबळेश्वर:पंचायत समिती महाबळेश्वरच्यावतीने घेणेत आलेल्या तालुकास्तरीय ‘प्रज्ञाशोध परीक्षा’ इ.४ थी व इ.७ वी चा निकाल आज महाराष्ट्र दिनी जाहीर करणेत आला..शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे व्हावी तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढावी यासाठी सदरची परीक्षा पंचायत समितीच्या सेस फंडातील तरतुदीतून घेणेत आली होती..

 

सदर परीक्षेचा निकाल जाहीर केलेनंतर परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रथम २५ क्रमांकांच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, सहा.गटविकास अधिकारी सुनील पारठे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र भिलारे, समितीचे नेते भाऊसाहेब दानवले, वाचनालयाचे अध्यक्ष दगडू ढेबे, उर्दू शिक्षक संघटनेचे नेते नासीर वारुणकर, केंद्रसंचालक सुशांत मोतलिंग, जयराज जाधव शिष्यवृृत्ती तालुकासमन्वयक संतोष ढेबे व क्रीडा तालुकासमन्वयक श्रीगणेश शेंडे, अधिक्षक किसन दिवटे, कक्ष अधिकारी प्रभाकर शेंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला..

 

तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढणेसाठी प्रज्ञाशोध परीक्षा महत्वाचा टप्पा ठरत असलेने पंचायत समितीच्या सेस फंडातून तालुकास्तरावर सदरची परीक्षा आयोजित करणेत आली..त्यातून शाळांची गुणवत्ता वाढणेस नक्कीच मदत होईल..अशी अपेक्षा गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांनी व्यक्त केली..

 

महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम अशा ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता प्रज्ञाशोध परीक्षेमुळे वाढणार आहे..असा ठाम विश्वास सहा.गटविकास अधिकारी सुनील पारठे यांनी व्यक्त केला..

 

सदर परीक्षेत इ.४ थी साठी ५०४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते,त्यांच्या पात्रतेची टक्केवारी ४५.५९% असून इ.७ वी साठी ३४३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यांच्या पात्रतेची टक्केवारी ३०.०३% आहे..सदरची टक्केवारी यापुढील काळात वाढविणेसाठी शाळास्तरावर शिक्षकांच्या माध्यमातून नियोजनबद्ध पध्दतीने कृती आराखडा तयार करुन कार्यवाही करणेत येणार असून निकालाच्या पात्रतेची टक्केवारी वाढविण्यासह शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी कसे होतील? याकडे प्राधान्य दिले जाणार असलेचे मत गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी व्यक्त केले..

 

सदर कार्यक्रम प्रसंगी शिक्षक संघटना प्रतिनिधी सुरेंद्र भिलारे, दगडू ढेबे, भाऊसाहेब दानवले यांनी मनोगते व्यक्त केली..तत्प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या २३ स्पोर्ट्स कीटचे वितरण आणि प्राथ.शिक्षक वाचनालयाच्यावतीने घेणेत आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील यशस्वी प्रथम तीन क्रमांकांच्या स्पर्धकांचेही मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले..

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने यांनी केले तर आभार संतोष शिंदे यांनी मानले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीगणेश शेंडे, समाधान देशमुख, अमोल कुंभार, अविनाश हजारे, तानाजी नगरे, सचिन चव्हाण, कुलदीप अहिवळे, अभिजीत खामकर, श्रीनिधी जोशी, पूनम घुगे यांनी विशेष परिश्रम घेतले…

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket