महाबळेश्वर दहा गाव मुस्लिम समाजाचा आमदार मकरंद पाटील यांना पाठिंबा
सातारा दि.महाबळेश्वर तालुका दहा गाव मुस्लिम समाजाने आमदार मकरंद पाटील यांना पाठिंबा जाहीर केला असून लिंग मळा महाबळेश्र्वर याठिकाणी झालेल्या मुस्लिम समाजाच्या मेळाव्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील सर्व मुस्लिम आमदार मकरंद पाटील यांनाच मतदान करणार असून आमदार मकरंद आबांनी जात,धर्म, गट न मानता मागील १५ वर्षात आमचे प्रश्न सोडविले असून तेच आमचे खऱ्या अर्थाने दाता आहेत असे भावनिक उदगार महाबळेश्वर चे माजी उप नगराध्यक्ष अफजल सुतार,माजी नगरसेवक नासिर भाई मुलाणी यांनी काढले.
महाबळेश्वर येथील लिंग मळा येथे महाबळेश्र्वर तालुक्यातील प्रमुख मुस्लिम नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार मकरंद पाटील पाठिंबा जाहीर केला.या प्रसंगी माजी महाबळेश्वरचे माजी उप नगराध्यक्ष अफजल सुतार ,माजी नगरसेवक नासिर भाई मुलांनी,मुबारक भाई शेख,फकीर भाई वलगे
महाबळेश्वर अर्बन बँकेचे चेअरमन समीर सुतार,कासम,भाई नालबंध,अकबर भाई शारवान,मुन्ना भाई वांरूनकर,छोटू भाई वाईकर,नदीम शारवान,जावेद खारखंदे,शग्गिर बडाने,तौफिक पटवेकर,मुक्तार भाई बागवान इत्यादी दहा गाव मुस्लिम समाजाचे मान्यवर,पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना महाबळेश्र्वर नगरपालिकेचे माजी उप नगराध्यक्ष म्हणाले की मकरंद पाटील यांच्या सारखा जातीय सलोखा ठेवणारा नेता संपूर्ण महाराष्ट्रात नसेल.मागील १५ वर्षापासून मकरंद आबांनी जात,धर्म,गट,पक्ष न बघता कायमच आमच्या समाजाला सर्वोतोपरी मदत केलेली आहे.मकरंद आबांच्याकडे आम्ही जे जे मागितले ती प्रत्त्येक गोष्ट आबांनी आम्हाला दिली.त्यांनी कधीच आमच्या कोणत्याही मागणीकडे दुर्लक्ष केले नाही.आम्हाला एवढा मान देणारा,आमच्या सुख दुःखात आमच्यासाठी धावत येणारा असा नेता आम्ही आज पर्यंत कधीच पाहिला नाही.मानवता हाच मकरंद आबांचा खरा पक्ष असून आमदार मकरंद पाटील यांच्या साठी आम्ही वाई खंडाळा आणि महाबळेश्वर अश्या तिन्ही तालुक्यात प्रचार करणार आहोत असे भावनिक उदगार ही याप्रसंगी महाबळेश्वर तालुक्याच्या दहा गावच्या मुस्लिम प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काढले.
या प्रसंगी बोलताना आ.मकरंद पाटील म्हणाले की मागील १५ वर्षात मी कधीच कोणाला दुखावले नाही.कोणत्याही पक्षाचे,जाती धर्माचे लोक माझ्याकडे आले तर मी प्रत्येकाचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.कोणत्याच गरजू व्यक्तीला मी रिकाम्या हाताने पाठविले नाही.सर्वच जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहणारे आपले तिन्ही तालुके आहेत याचा मला प्रचंड अभिमान वाटतो.आज पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम समाजाने माझा प्रचार ही केला आहे आणि मला भरघोस मते ही दिली आहेत.म्हणूनच यापुढेही त्याचे सर्व प्रश्न सोडविण्याचा आणि त्यांच्या सुखदुःखात कायम सोबत राहण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.या प्रसंगी मुस्लिम समाजातील नागरिक,व्यापारी,व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी महाबळेश्वर मधील घोडा युनियन संघटना,वेण्णा लेक व्यापारी संघटना,पतारी वाली संघटना,आईस गोळे वाले संघटना अश्या चारही संघटनांच्या पदाधिकारी,व्यवसायिकांनी आमदार मकरंद पाटील यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला.
