साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे साताऱ्यात दक्षता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा एकमेकांशी डोकीफोड! नेत्यांचे जमले, कार्यकर्त्यांचे फाटले! जिल्हा बँकेच्या राजकारणात निष्ठावंतांची फसवणूक? वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत अर्णवी वन्नेचा १९ वा वाढदिवस उत्साहात साजरा! ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा ५ नोव्हेंबरला कोल्हापूर पीएफ कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये मायक्रो-प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात संपन्न
Home » राज्य » प्रशासकीय » एसटीचे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट मिळणार

एसटीचे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट मिळणार

एसटीचे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट मिळणार

मुंबई- एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

1 जूनला एस टी च्या 77 व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत उद्यापासून (1 जुलै) लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

 

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, npublic.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना १५ टक्के सवलत प्राप्त करता येऊ शकते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळानं 15 टक्के भाडेवाढ केली होती. या भाडेवाढीचा फटका लांबपल्ल्याच्या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला होता. एसटी महामंडळाच्या या निर्णयानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एसटीचे प्रवासी या निमित्तानं वाढतात का ते लवकरच दिसून येईल. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप

साताऱ्यात ३ नोव्हेंबरपासून लाडू-चिवडा महोत्सवाची मेजवानी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्तुत्य उपक्रम; संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन

Live Cricket