Home » सहकार » सातारा जिल्हयातील शेतक-यांचे ऊस उत्पादन वाढीसाठी सातारा जिल्हा बँक व म.फु. कृषि विद्यापीठ संयुक्तपणे राबवित असलेला प्रकल्प राज्यालाच नव्हे तर देशाला दिशादर्शक  कुलगुरू कर्नल डॉ. पी. जी. पाटील

सातारा जिल्हयातील शेतक-यांचे ऊस उत्पादन वाढीसाठी सातारा जिल्हा बँक व म.फु. कृषि विद्यापीठ संयुक्तपणे राबवित असलेला प्रकल्प राज्यालाच नव्हे तर देशाला दिशादर्शक  कुलगुरू कर्नल डॉ. पी. जी. पाटील

सातारा जिल्हयातील शेतक-यांचे ऊस उत्पादन वाढीसाठी सातारा जिल्हा बँक व म.फु. कृषि विद्यापीठ संयुक्तपणे राबवित असलेला प्रकल्प राज्यालाच नव्हे तर देशाला दिशादर्शक

 कुलगुरू कर्नल डॉ. पी. जी. पाटील

हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे घटणारी ऊस उत्पादकता व साखर उतारा, वाढता उत्पादन खर्च खोडवा ऊसाखालील कमी होणारे क्षेत्र व साखर कारखान्यांना गळीतासाठी दिवसेंदिवस कमी होणारी ऊस उपलब्धता हे चिंतेचे विषय आहेत या अनुषंगाने पुढील वर्षीच्या गळीत हंगामासाठी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील खोडवा ऊसाचे प्रमाण व उत्पादकता वाढविण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरणपुरक खोडवा ऊस उत्पादन वाढ प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापिठाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली राबविणेत येत आहे.

या महत्वाकांक्षी व नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत किसनवीर सहकारी साखर कारखाना, खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर्स, खटाव माण अॅग्रो प्रोसेसोंग लि, रयत अचणी साखर कारखाना व श्रीराम सहकारी साखर कारखाना, अशा सातारा जिल्हयातील ७ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण ३०२५ शेतक-यांच्या शेतावर पर्यावरणपूरक खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके राबविणेसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक व साखर कारखान्यांच्या आर्थिक सहकार्यातून व महात्मा फुले कृषि विद्यापिठाच्या पुणे येथील कृषि महाविद्यालयामार्फत माती व पाणी परीक्षण आधारीत संपूर्ण मार्गदर्शन सहभागी शेतक-यांना करण्यात येत आहे.

या प्रकल्पाचा पुढील टप्पा म्हणजेच सातारा जिल्हयातील साखर कारखान्यांच्या शेती विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षित करून पर्यावरणपुरक खोडवा ऊसाचे अद्यावत तंत्रज्ञान निवडलेल्या शेतक-यांच्या शेतावर काटेकोरपणे व प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी “पर्यावरणपूरक खोडवा व्यवस्थापन कुशल प्रशिक्षक” बनविणे यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, कृषि महाविद्यालय, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरणपूरक खोडवा ऊसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादनासाठी कुशल प्रशिक्षक निर्माती कार्यशाळेची सुरूवात दि. २१ मे, २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह सातारा जिल्हा मध्यवर्ती बैंक सातारा येथे सकाळी ९.०० वाजता मा. आ. रामराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ संचालक सा जि. म. सह. बँक, व डॉ. पी. जी. पाटील म.फु.कृ.वि राहुरी यांचे हस्ते भूमाता पूजनाने झाली कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या विधानपरिषदेचे माजी सभापती मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते, याप्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. नितीन जाधव (पाटील), उपाध्यक्ष मा. श्री. अनिल देसाई, बैंकेचे संचालक व माजी आमदार मा. श्री. प्रभाकर घार्गे, श्री. सुनिल खत्री, श्री. सुरेश सावंत, जेष्ठ मृदाशास्त्रज्ञ डॉ. आबासाहेब ढाणे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ सुनिल गोरंटीवार, पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासाळकर व माती व पाणी परिक्षण व्यवस्थापक डॉ धर्मेंद्रकुमार फाळके व कृषि विद्यापीठातील विषय तज्ञ उपस्थित होते

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका विशद करून शेतकरी हितासाठी बैंक राबवित असलेल्या योजनाविषयी माहिती दिली, महाराष्ट्राच्या ऊस उत्पादनात सातारा जिल्हयाचा वाटा १० टक्के इतका असून तो विद्यापिठातील अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व सहभागी कारखान्यांच्या सहकार्याने आपणाला तो दुप्पट करणेच्या दृष्टीने सर्वांनी सामूहीक प्रयत्न करणे गरजेचे आहे,

आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, शास्त्रीय पध्दतीने व आधुनिक शेती व्यवसाय करणेचा दृष्टिकोन अलिकडे बाढत आहे, परंतु जागतिक तापमान वाढीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत असून या समस्येला सामोरे जाणारी माणसे आपण तयार केली पाहिजेत, ऊस पिक इतर पिकापेक्षा अतिशय काटक आहे व रोग किडीला प्रतिकार करते, जंगली झाडांप्रमाणे मुळा‌द्वारे जमिनीत अतिरिक्त कार्बन पोहोचविण्याचे काम केले जाते, हवेतील कार्बनडाय ऑक्साइड शोपून वैश्विक तापमान वाढीस प्रतिबंध करते.

मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी म्हणाले, बदलत्या हवामानाचा विचार करून खोडवा पिकाचे उत्पादन कसे घ्यावे, यासंबंधी बँकेने कार्यशाळा आयोजित केली आहे, ही चांगली बाब आहे वैश्विक तापमान वाढीच्या काळात शेतक-याला उपयोगी पिक म्हणजे ऊस आहे, हुकमी बाजारभाव व बांगल्या नियोजनाला प्रतिसाद देत असल्याने शेतक-यांचा ऊस पिकाकडे कल असतो, ऊस हे सी-४ वर्गातील पिक असल्याने हवेतील कार्बन कमी करून मातीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण प्रक्रिया बजावते, ऊस हे पर्यावरणपूरक पिक असल्याने जंगली झाडांप्रमाणे ऊसासाठी कार्बन क्रेडिट मिळू शकते.

 

तांत्रिक मार्गदर्शन सत्रात डॉ धर्मेंद्रकुमार फाळके व्यवस्थापक माती व पाणी परिक्षण पि महाविद्यालय पुणे, यांनी पर्यावरण पूरक ऊस उत्पादन वाढ व व्यवस्थापन अनुषंगाने जिल्हयातील सहभागी साखर कारखान्यांच्या ६०० अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच डॉ. सुरज नलावडे, डॉ. संतोष मोरे, डॉ. महानंद माने, डॉ. सचिन नलावडे, डॉ. ताई देवकाते यांनी ठिबक सिंचन, ड्रोन व्यवस्थापन, खोडवा ऊसाचे अर्थकारण, रोग व किडींचे एकात्मिक व्यवस्थापन व नियोजन, मित्र किडींचे संगोपन या विषयांवर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले प्रशिक्षणार्थर्थीनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देवून मार्गदर्शन केले.

तात्रिक सत्राचे अध्यक्ष व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री नितीन काका पाटील यांनी सहभागी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व शेती अधिकारी यांना खोडवा ऊस पिकाप्रमाणेच अडसाली व पूर्व हंगामी ऊस उत्पादन वाढीसाठी कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतक-यांना सहभागी करून घेवून बँकेच्या व कारखान्यांच्या माध्यमातून माती व पाणी नमुने मोफत तपासून घेणेच्या सूचना केल्या.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. कर्नल डॉ. पी. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व वैकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे, किसन वीर सहाकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जितेंद्र रणवरे, मिटकॉनचे वरीष्ठ व्यवस्थापक श्री धवल नरगधे व खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाले अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जिवाजी मोहिते, यांनी महाराष्ट्रातील अनेक नामवंत साखर कारखान्यात काम केले असून, बैंक शेतक-यांसाठी कारखान्यांच्या माध्यमातून राबवित असलेल्या ऊस उत्पादन वाढीच्या अनोख्या उपक्रमाबद्दल बैंकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सर्व संचालक मंडळ व अधिका-यांचे आभार मानले, साखर कारखान्यातील उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचा-यांना पर्यावरण पूरक खोडवा ऊस व्यवस्थापनाची शपथ देऊन प्रमाणपत्रे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली, बैंकचे उपाध्यक्ष मा. श्री. अनिल देसाई यांनी कार्यशाळेस उपस्थित मान्यवर, अधिकारी, शेतकरी सभासद यांचे आभार मानले व सातारा जिल्हयातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊस उत्पादनात दुप्पट वाढ करणेच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचा महत्त्वाचा म्हणजे शेतक-यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष कार्यरत होणेच्या कामकाजास सुरूवात झाली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket