Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » समाजसेवक रवींद्र कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

समाजसेवक रवींद्र कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

समाजसेवक रवींद्र कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, खाऊ वाटप, अन्नदान आदी भरगच्च समाजोयोगी उपक्रम साजरे

सातारा /प्रतिनिधी : येथील संजीवन बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यापारी रविंद्र उत्तमराव कांबळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

   शुक्रवारी सकाळी चिपळूणकर बागे शेजारील राहत्या घरी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन वाढदिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर श्रीक्षेत्र यवतेश्वर येथील मंदिरात रविदादा कांबळे यांनी सपत्नीक योगेश्वर महादेवाची पूजा व महाआरती केली. त्यानंतर उपळी ता सातारा येथील स्वर्गीय शारदाबाई पवार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. सकाळी दहा वाजता आसनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब गरजू व होतकरू अशा दोन मुली व पाच मुलांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेण्यात येऊन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. दुपारी बारा वाजता रहिमतपूर रोड कोडोली येथील आशा भवन या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. त्यानंतर शेंद्रे येथील हॉटेल प्रियंका मध्ये केक कापून हितचिंतकांच्या शुभेच्छांचा स्वीकार व मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. सायंकाळी साडेपाच वाजता मंगळवार पेठेतील शाहू बोर्डिंग जमिनीची बाग येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले त्यानंतर पोवई नाक्यावरील भाजी मंडई मार्केट यार्ड येते केक कापून उपस्थित त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. रात्री आठ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, तुरुंग अधिकारी शेडगे,तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. तांबे, संजीवन संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, व्यापारी श्री. अमीन कच्छी आदींच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.  

विविध मान्यवरांनी श्री.कांबळे यांच्या व्यापार क्षेत्रातील भरारीबरोबरच सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तसेच पदरमोड करून समाजसेवेचे हे व्रत अखंड जपण्याची वृत्ती आदर्शवत आहे, असेही सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 124 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket