भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गुरुवार दिनांक 18- 4- 2024 रोजी सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.पक्षीय बलाबलाचा विचार करता महायुतीकडे चार आमदार, तर आघाडीकडे दोन आमदार आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप), शंभूराज देसाई (शिवसेना शिंदे), मकरंद पाटील (राष्ट्रवादी अजित पवार) आणि महेश शिंदे (शिवसेना शिंदे) या चार आमदारांची ताकद उदयनराजेंच्या बाजूने आहे. याउलट आघाडीचे आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी शरद पवार) आणि पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) या दोनच आमदारांची मदत शिंदे यांना होणार आहे. महायुती प्रबळ दिसत असून येणाऱ्या काळात मतदाराचा कौल दिसून येणार आहे.
माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब भाजपा ची संपूर्ण ताकत उदयनराजे राजे साठी लावणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा कस सातारा जिल्ह्यात लागणार आहे.