तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
(स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई)
तडीपार इसमास जेरबंद करुन त्याचेकडुन बेकायदेशिर देशी बनावटीच्या 3 पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल असा एकुण 3,29,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
सातारा -मा.श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक,सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक ,सातारा यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखचे सर्व अधिकारी व अंमलदार यांना अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याचे सुचना दिलेल्या आहेत.
दिनांक 28/08/2026 रोजी विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, करंजे येथील महानुभव मठाचे जवळ रोडवर फलटण परिसरातील एक इसम त्याचे ताब्यातील शाईन मोटार सायकल क्रमांक MH-53-8193 वरुन गावठी पिस्टल विक्री करीता घेवुन येणार आहे. अशी गोपनिय बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सातारा शहरात पेट्रोलींग करणारे पथकास देवुन मिळाले बातमी प्रमाणे सापळा लावुन खात्री करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने महानुभव मठाचे जवळ परिसरात रोडवर सापळा लावला. त्यानंतर रात्रौ. 20.10 वा. चे सुमारास मिळाले बातमीतील इसम हा त्याचेकडील मोटार सायकलवरुन आल्यावर त्यास पोलीस पथकाने शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण 03 देशी बनावटीची पिस्टल मॅग्झीनसह , तीन जिवंत काडतुसे, मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल असा एकुण 3,29,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच सदर इसमा बाबत अधिक माहिती घेतली असता तो सातारा जिल्हा हद्दीतुन 2 वर्षाकरीता तडीपार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर नमुद इसमावर शाहुपूरी पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगले बाबत गुरनं. 271/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3(1),25 सह महा.पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.आरोपीचे नाव – महेश गणपत इंगळे वय-27 वर्षे, रा. आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण ता.फलटण जि.सातारा
सदर कारवाई मध्ये मा.श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ.वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर, चंद्रकांत पुजारी, सफौ. राजु मुलाणी, अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अमीत झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, इरफान मुलाणी, संकेत निकम, चालक अकबर खान जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेचे अमोल घाडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा, व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
——————————————————————-





