Home » Uncategorized » सातारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवेंद्रराजेंनी नेहमीच प्राधान्य दिले-श्रीमंत छत्रपती सौ.वेदांतिकाराजे

सातारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवेंद्रराजेंनी नेहमीच प्राधान्य दिले-श्रीमंत छत्रपती सौ.वेदांतिकाराजे

सातारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवेंद्रराजेंनी नेहमीच प्राधान्य दिले-श्रीमंत छत्रपती सौ.वेदांतिकाराजे

भुईज (महेंद्रआबा जाधवराव )मताधिक्याने विजयी करण्याचा नागरिकांनी केला निर्धार सातारा- हद्दवाढ मंजुरी, कास धरणाची उंची वाढ, मेडिकल कॉलेज, शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण अशी महत्वकांक्षी विकासकामे आ. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्यातून मार्गी लागली आहेत. सातारा शहराचा विकासात्मक कायापालट करतानाच सातारकरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत आहेत. सातारा- जावली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करतानाच शिवेंद्रराजेंनी सातारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारकरांनी शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. 

          सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात विविध भागामध्ये पदयात्रांचा धडाका सुरु आहे. रविवारी सकाळी सुरुची बंगला, कोटेश्वर चौक, जाधव आवाड, ऐक्य प्रेस, बुधवार नाका, लकडी पूल ते ५०१ पाटी अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. वेदांतिकाराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.  

           वेदांतिकाराजे म्हणाल्या, आपल्या ऐतिहासिक सातारा नगरीचा विकासकामांच्या माध्यमातून कायापालट करून दोन्ही राजांनी साताऱ्यातील सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. सर्वधर्म समभाव या न्यायाने सर्वांना सामान धरून, गट तट न मानता प्रत्येक भागात विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. आपल्या शहरासह संपूर्ण मतदारसंघात विकासकामांचा झंजावात असाच सुरु राहिला पाहिजे. विकासपर्व पुढेही अखंडपणे सुरु राहिले पाहिजे, यासाठी शिवेंद्रराजेना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले. 

           सोमवार दि. ११ रोजी सकाळी १० वाजता सेनॉर चौक, आंदेकर चौक, बाबर कॉलनी, डॅनी पवार, झेंडा चौक, बाळासो भुजबळ घर, भैरवनाथ मंदिर, पटांगण ते जगन्नाथ किर्दत घर अशी पदयात्रा, कोपरा सभा रात्री ८ वाजता धीरज ढाणे मंगळवार तळे येथे होणार आहे. पदयात्रा आणि कोपरा सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.; मताधिक्याने विजयी करण्याचा नागरिकांनी केला निर्धार 

          सातारा- हद्दवाढ मंजुरी, कास धरणाची उंची वाढ, मेडिकल कॉलेज, शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण अशी महत्वकांक्षी विकासकामे आ. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्यातून मार्गी लागली आहेत. सातारा शहराचा विकासात्मक कायापालट करतानाच सातारकरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत आहेत. सातारा- जावली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करतानाच शिवेंद्रराजेंनी सातारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारकरांनी शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. 

          सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात विविध भागामध्ये पदयात्रांचा धडाका सुरु आहे. रविवारी सकाळी सुरुची बंगला, कोटेश्वर चौक, जाधव आवाड, ऐक्य प्रेस, बुधवार नाका, लकडी पूल ते ५०१ पाटी अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. वेदांतिकाराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.  

           वेदांतिकाराजे म्हणाल्या, आपल्या ऐतिहासिक सातारा नगरीचा विकासकामांच्या माध्यमातून कायापालट करून दोन्ही राजांनी साताऱ्यातील सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. सर्वधर्म समभाव या न्यायाने सर्वांना सामान धरून, गट तट न मानता प्रत्येक भागात विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. आपल्या शहरासह संपूर्ण मतदारसंघात विकासकामांचा झंजावात असाच सुरु राहिला पाहिजे. विकासपर्व पुढेही अखंडपणे सुरु राहिले पाहिजे, यासाठी शिवेंद्रराजेना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले. 

           सोमवार दि. ११ रोजी सकाळी १० वाजता सेनॉर चौक, आंदेकर चौक, बाबर कॉलनी, डॅनी पवार, झेंडा चौक, बाळासो भुजबळ घर, भैरवनाथ मंदिर, पटांगण ते जगन्नाथ किर्दत घर अशी पदयात्रा, कोपरा सभा रात्री ८ वाजता धीरज ढाणे मंगळवार तळे येथे होणार आहे. पदयात्रा आणि कोपरा सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 20 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket