Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा ते रायगड सायकलवर प्रवास करून शिवराज्याभिषेक दिन

सातारा ते रायगड सायकलवर प्रवास करून शिवराज्याभिषेक दिन

सातारा ते रायगड सायकलवर प्रवास करून शिवराज्याभिषेक दिन

सातारा, ता. ११ : येथील संदीप जाधव या तरुणाने सातारा ते रायगड किल्ला असा सायकल प्रवास करून रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, किल्ले रायगड असा टप्पा पार करत दोन दिवसांत हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज श्री किल्ले रायगड येथे पोचला.

संदीप जाधव याने बुधवारी (ता. पाच) पहाटे साताऱ्यातून सायकल प्रवास सुरुवात केली. महाबळेश्वरमार्गे १४० किलोमीटरचा प्रवास करून तो रायगड किल्ल्यावर पोचला. आजूबाजूचं आल्हाददायक वातावरण, चित्रातल्यासारखी गावं, डोंगरदऱ्या, नद्या, घाटाला असलेला धोकादायक उतार, जोरदार वाहणारे वारे अनुभवत त्याने रायगड सर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर त्याने परतीचा प्रवास सुरू केला. तो नुकताच साताऱ्यात पडला असून, नागरिकांनी त्याचे जोरदार स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोचावेत, यासाठी तो अनेक संस्थांशी संवाद साधत आहे. या यात्रेत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, कुठेही असुरक्षित वाटत नसल्याचे त्याने सांगितले.

शाहूपुरी : सातारा ते रायगडपर्यंतचा सायकल प्रवास पूर्ण केल्याबद्दल संदीप जाधव याचा सत्कार करताना अमित कुलकर्णी, रमणी कुलकर्णी, मंजूषा बारटक्के, शिल्पा पाटील.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दोनवेळा पडलेला समोरचा माणूस पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? दोन-तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा येतो कुठून?-सुषमा अंधारे

दोनवेळा पडलेला समोरचा माणूस पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? दोन-तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा येतो कुठून?-सुषमा अंधारे कराड

Live Cricket