सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंच्या विरोधात शड्डू ठोकला.
सातारा (अली मुजावर ):सातारा मतदारसंघातून महायुती उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र, महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे राजेंना टक्कर देण्यासाठी कोणता उमेदवार महाविकास आघाडी देणार याची चर्चा होती . ही जागा ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाकडे आहे. शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्ह्याचे हे हेवीवेट आमदार शशिकांत शिंदे नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.साताऱ्यात हेविवेट नेत्यांची हाय होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.
2019 लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी सहा महिन्यांतच राजीनामा देऊन पुन्हा भाजपकडून पोटनिवडणूक लढवली होती. मात्र पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आले
आ.शशिकांत शिंदेंना मानणारा सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग असून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याप्रमाणे आमदार शिंदे आपला करिष्मा दाखवणार का हे पहावे लागणार आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मागील लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघात जोमाने कार्य सुरू केले आहे. संपूर्ण सातारा जिल्हा लोकसभा मतदार संघ त्यांनी पिंजून काढला आहे.