सेल्फी ठरली जीवघेणी बोरणे(ठोसेघर )घाटात युवती पडली दरीत
सातारा जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू आहे सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पर्यटन स्थळे धबधबे बंद. काही पर्यटक मात्र जीव धोक्यात घेऊन धबधब्याकडे जातांना दिसत आहेत. ठोसेघर येतील रस्त्यावरील बोरणे घाटात घडली असून सेल्फी घेण्याच्या नादात युवती दरीत पडली.त्या तरुणीला वन समिती होमगार्डच्या युवकांनी दरीतून सहिसलामत बाहेर काढले.
याबाबत अधिक माहिती अशी तिच्या मित्रपरिवारा सोबत पावसाळी पर्यटनानिमित्त सज्जनगड, ठोसेघर कडे आले होती. बोरणे घाटातील कठड्यावर ते फोटोसेशन करत होते फोटोसेशन करत असतानाच सेल्फी काढण्याच्या नादामध्ये संबंधित युवती चा तोल जाऊन ती खोल दरीत पडली ही दरी सुमारे 100 फूट खोल असेल.ठोसेघर वन समितीचे प्रवीण चव्हाण प्रथमेश जानकर प्रतिक काकडे रामचंद्र चव्हाण तसेच होमगार्ड अविनाश मांडवे सागर मदने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व आपला जीव धोक्यात होमगार्ड अविनाश मांडवे हे दोरीने खाली उतरून त्यांनी सदर युवतीला दरीतून बाहेर काढले.तसेच पुढील उपचारासाठी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले
ठोसेघर परिसरात पर्यटकांना येण्यासाठी नो एन्ट्री आहे. मात्र पर्यटक या परिसरामध्ये बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. पोलीस प्रशासनाने याबाबत अधिक गंभीर होणे आवश्यक आहे.
