नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर शाळेमध्ये भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी संतोष पाटील

शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर शाळेमध्ये भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी संतोष पाटील

शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर शाळेमध्ये भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा -शाळा या जीवन शिक्षण देणारी मंदिर असल्यामुळे शाळेतील भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. 

प्रतापसिंह हायस्कूल येथे आज विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रवेशोत्सव २०२६ कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. नगर सेविका भारती शिंदे, किरण पाटील, शाळेचे मुख्याधपक व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, आज प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी नक्कीच काही विद्यार्थी देश पातळीवर शाळेचे नाव उज्ज्वल करतील. प्रतापसिंह हायस्कुलला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे प्रकांड पंडित या शाळेने घडविले आहेत. तसेच मुंबई प्रांताचे माजी मुख्यमंत्री धनजीशा कूपर, यांच्यासह अनेक उद्योजक, कृषितज्ज्ञ नेते या शाळेने घडविले आहेत. शाळेचे नाव उज्ज्वल करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. आज उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी भविष्यात आय. ए. एस. व्हावे आणि असाच कार्यक्रम घ्यावा अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे आणि देश पातळीवर शाळेचे नाव उंचवावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.

यावेळी दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने उत्स्फूर्त भाषण केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.  

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket