सातारा शहरात दुभाजकात जाहिरात फलक मनमानी कारभाराला रोखणार कोण
सुशोभीकरणाच्या दुभाजकात पालकमंत्र्यांचे जाहिरात फलक झळकले, रस्ते वाहतूक सुरक्षेला धोका ,चमकोगिरी कार्यकर्त्यांची कमाल ,दुभाजकातील वृक्षांना धोका…
सातारा – नेत्यांच्या लोकप्रियतेचा लाभ घेत चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील दुभाजकांमध्ये घुसखोरी करीत लावलेल्या जाहिराती फलकामुळे रस्ता सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे मुळात सातारा शहरात अरुंद रस्ते त्या मधोमधच दुभाजक त्यामुळे अरुंद झालेला रस्ता वाहन चालकांना सातारा शहरातील रस्त्यावरून वाहने चालविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते त्यातच चमकोगिरी कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या निवडीचे लावलेले जाहिरात फलकाची भर पडत आहे सातारा शहराच्या विविध भागात असणारे दुभाजक आता जाहिरात फलकाचे केंद्र होऊ लागले आहेत नेत्यांबरोबरच स्वतःचा फोटो जाहिरातीवर झळकून आपणच खऱ्या अर्थाने नेत्याचे तारणहार दाखविण्याचा प्रयत्न चमकोगिरी कार्यकर्ते कडून होत आहे चमकोगिरी कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात रस्ता सुरक्षितेचा प्रश्न सातारकरांसाठी गंभीर बनत असताना आता दुभाजकामध्ये राजकीय नेत्यांचे जाहिरात फलक झळकत आहे दुभाजकावर ताबा घेऊन स्वतःची लोकप्रियता वाढविणाऱ्या चमकोगिरी कार्यकर्त्यांवर संबंधित यंत्रणेने खरे तर कारवाई करणे गरजेचे आहे सत्तेच्या नावाखाली वाटेल ते करण्याची प्रवृत्ती भविष्यात लोकशाहीसाठी घातक ठरेल शहरातील दुभाजक हे खरे सुरक्षित वाहतुकीसाठी व शहराचे सौंदर्य फुलविण्यासाठी असताना दुभाजकामध्ये जाहिरात फलक लावण्याचे धारिष्ठ कार्यकर्ते कसे करतात हा संशोधनाचा विषय आहे त्याच्यावर प्रशासकीय अंकुश आहे की नाही याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे
वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असणाऱ्या मार्गावरील दुभाजकात जाहिरात फलक लावण्याचे कार्यकर्त्यांमध्ये जणू काही स्पर्धाच लागल्याची दिसून येते नेत्यांचा सच्चा व एकनिष्ठ कार्यकर्ता दाखवण्याचा एक केविलवाणी प्रयत्न या माध्यमातून चमकोगिरी कार्यकर्ते करीत आहेत शहराचे सौंदर्य विद्रूप करणारे व वाहतूक समस्येला जाहिरात फलक अडथळा निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणे आता गरजेचे आहे या प्रवृत्तीवर वेळीच बंदी न घातल्यास दुभाजकातील सुशोभित वृक्षांच्या जागी जाहिरात फलकांचे पीकच भविष्यात फोफावेल.
सातारा शहरातील ठिकठिकाणी पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा बॅनर लावण्यात आलेले आहेत काही उत्साही कार्यकर्त्यांनी शहरातील विशेषता पोवईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट पर्यंतच्या दुभाजकात फलक झळकले आहेत त्यामुळे सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे दुभाजकामधील जाहिरात फरक त्वरित हटवणे गरजेचे आहे बऱ्यादा जलद वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हे फलक वाहनावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
श्रीरंग काटेकर सातारा.
