सातारा शुक्रवार पेठेतील विहिरीला झाडाझुडपांचा विळखा
विहीर स्वच्छतेच्या प्रतीक्षेत ,प्रशासनाचे दुर्लक्ष
सातारा – शुक्रवार पेठेतील बदामी विहीर शेजारी असलेली लोखंडी बंदिस्त विहिरीला झाडाझुडपात विळखा पडला असून या विहिरीत वङ पिंपळ व इतर वृक्षांनी बहरले आहे वाढलेल्या वृक्षांची पाने विहिरीत पडून मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे साचलेला कचरा पाण्यात पडून तो कुजल्याने त्याची दुर्गंधी येत आहे परिणामी सदर विहिरीतील पाणी हे दूषित झाले आहे विहिरीतील असलेल्या कचरा व विहीर स्वच्छता होणे गरजेचे आहे नजीकच्या काळात पावसाचे पडणारे पाणी पाहता या विहिरीतील साचलेल्या कचऱ्यामुळे रोगराईचा फैलाव होऊ शकतो मुळात या विहिरीचा उपसा न झाल्याने येथील पाण्यात जीव जंतूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते घातक ठरत आहे बंदिस्त विहिरीतील वाढलेले झाडे झुडपे काढून ही विहीर स्वच्छ करावी अशी मागणी पेठेतील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे काही वर्षांपूर्वी येथील स्थानिक नागरिकांसाठी ही विहीर जलसंजीवनी ठरत होती या विहिरीचा वापर नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी व घरगुती वापरण्याच्या कामासाठी करीत होते परंतु काळाच्या ओघात प्रत्येकाच्या घरात नळाचे कनेक्शन पोहोचल्याने या विहिरीचा वापर बंद झाला परिणामी ही विहीर दूषित व दुर्गंधी युक्त झाली
अनंत इंग्लिश स्कूल ते गेंडामाळ नाका या मार्गावर शुक्रवार पेठ येथे रस्त्याकडेला असलेल्या या विहिरीची ङागङुज करून या विहिरीला लोखंडी ग्रील सह झाकण टाकून विहीर सुरक्षित केली स्थानिक नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या पुढाकाराने लाखो रुपये या विहिरीवरती खर्च करण्यात आले परंतु प्रशासनाचे झालेल्या दुर्लक्षामुळे या विहिरीला आता झाडाझुडपाचा विळखा पडला आहे
जल है तो कल है पाणी हे जीवन आहे त्याचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे बदामी विहिरी लगतच्या या विहिरीत मुबलक पाणीसाठा आहे त्याचे नियमित उपसा झाल्यास शहरातील अनेक भागातील पाणीटंचाई वर मात करणे शक्य आहे ही विहीर बंदिस्त व सुबक असून ती स्वच्छ होणे आवश्यक आहे श्रीरंग काटेकर सातारा