पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टर आता साताऱ्यात उपलब्ध
सातारा दि. ३ : मेंदूपासून टाचेपर्यंतच्या विविध अवयवांचे आजार व त्यावरील उपचारांसाठी रुग्णांना पुण्याची वारी करावी लागते. यामध्ये वेळ व पैसा खर्च होतो. गैरसोईमुळे अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. रुग्णांची गरज लक्षात घेऊन सातारा हॉस्पिटल व सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये या क्षेत्रातील पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन, उपचार व गरजेनुसार शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याबाबतची माहिती सातारा हॉस्पिटल व सातारा डायग्नोस्टिक सेंटर व्यवस्थापनाकडून देण्यात आली. हॉस्पिटल व्यवस्थापनाने सांगितले, की हृदयाशी निगडित महाराष्ट्रातील नामवंत कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ ३१ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध असतील. पुण्यातील नामवंत कार्डिओलॉजिस्ट डॉ. मधुसूदन आसावा दर बुधवारी व शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून उपलब्ध असणार आहेत.
पोट विकार तज्ज्ञ (गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट) डॉ. एम. के. पांडा हे ७ व २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून तर गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. सुहास उदगीरकर हे १४ व २८ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून उपलब्ध आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ (न्यूरो फिजिशियन) डॉ. सुजित जगताप हे दर शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून तर न्यूरोलॉजिस्ट आणि व्हर्टिगो स्पेशलिस्ट डॉ. महाबल शहा हे दर बुधवारी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. हर्षवर्धन ओक हे २८ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते तीन तर डॉ. भूषण शिंदे १७ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजल्यापासून सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
संधिवात तज्ज्ञ डॉ. विनया कुंजीर या २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून, पुण्याच्या प्रसिद्ध संधिवात तज्ज्ञ डॉ. वृषाली वाघ या ८ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून तर एंडोक्रीनॉलॉजिस्ट डॉ. आदित्य देशपांडे हे ६ व २० ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळात उपलब्ध असणार आहेत. पुण्यातील प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अभय सदरे हे १७ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजल्यापासून किडनी व त्या संबंधित आजारांवर उपचार मार्गदर्शन व सल्ल्यासाठी सातारा हॉस्पिटल येथे उपलब्ध असतील. यूरोलॉजिस्ट डॉ. ऋषिकेश वेल्हाळ २२ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून उपलब्ध आहेत. दरम्यान, सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माधवबाग सेंटर हेड डॉ. देवकी पळणीटकर या रोज सकाळी 10 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सेंटरवर रुग्णसेवेसाठी उपलब्ध असतात. गरजू रुग्णांनी या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही हॉस्पिटल व्यवस्थापनाने केले.