Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » पुणे-बंगळूर महामार्गावर उंब्रजच्या पुलावर टायर फुटल्याने कंटेनरची ट्रकला भीषण

पुणे-बंगळूर महामार्गावर उंब्रजच्या पुलावर टायर फुटल्याने कंटेनरची ट्रकला भीषण

पुणे-बंगळूर महामार्गावर उंब्रजच्या पुलावर टायर फुटल्याने कंटेनरची ट्रकला भीषण

चालक जखमी

कराड प्रतिनिधी | पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज गावच्या हद्दीत कराडहून सातारच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा टायर फुटल्याने तो उंब्रज पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली असून उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत उंब्रज पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कराड होऊन सातारच्या दिशेने कंटेनर क्रमांक (एम एच 12 TV 9653) हा निघालेला होता. रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास कंटेनर करार होऊन सातारच्या दिशेने निघाला असता तो उंबरच येथे उड्डाण पुलावर आला यावेळी उंब्रज येथील उड्डाणपुलावर दुसरा ट्रक (क्रमांक 01 AA 2776) उभा होता. यावेळी उभ्या असलेल्या ट्रकला कंटेनर चा टायर फुटल्याने कंटेनर जोरात जाऊन धडकला धडक इतकी भीषण होते की कंटेनरची पुढील बाजू पूर्णपणे ट्रकच्या मध्यभागी जाऊन घुसली यामध्ये ट्रकच्या पुढील बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला. रात्रीचा अंधार असल्याने शिवाय कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याने त्यालगत होऊन जाणारी वाहतूक ही विस्कळीत झाली झाली. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सुमारे अर्धा ते एक तास वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा अपघात स्थळापासून लागल्या. 

दरम्यान या अपघाताची माहिती उंबरच पोलीस ठाणे तीन कर्मचारी तसेच महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघात त्यामध्ये कंटेनर मधील जखमी झालेल्या चालकास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच अपघात झालेला कंटेनर व ट्रक बाजूला केला व नंतर वाहतूक सुरळीत झाली.दरम्यान, या अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत या अपघाताचे नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झालेली नव्हती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket