Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या शिखरावर” – जीवन बदलवणाऱ्या प्रेरणादायी विचारांचे पर्व याचे तिसरे सत्र शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध वक्ते, इतिहास संशोधक आणि समाजसेवक श्री. नितीन बानुगडे पाटील यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा श्री विनोद कुलकर्णी , संचालक सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन , अध्यक्ष मा श्रीमती विजयाताई भोसले, अध्यक्ष प्रतापगड उत्सव समिती, व प्रमुख उपस्थिती म्हणून मा श्री दत्तात्रय ( बुवा ) खरात , माजी नगराध्यक्ष वाई नगर परिषद वाई मान्यवर लाभले होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी संस्था करीत असलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थापक स्व आनंद कोल्हापुरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून देखाव्यांद्वारे समाज प्रबोधन करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने सुरु केला होता व तो अविरत असाच सुरु ठेवण्याचा आमचा मानस आहे असे सांगितले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाई मधील ७० पेक्षा अधिक मंडळांना प्रसादासाठी साहित्य उत्कर्ष पतसंस्थेच्या माध्यामतून देण्यात आले. 

मा श्री विनोद कुलकर्णी यांनी उत्कर्ष पतसंस्थेने हाती घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाद्वारे समाज प्रबोधन करीत असलेया या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. श्री. नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या संवादात्मक शैलीतून जीवनातील संघर्ष, ध्येय आणि आत्मविश्वास यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी तरुणांना उद्देशून समाजासाठी काहीतरी विशेष करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या ओघवत्या भाषणात त्यांनी मानवी जीवनातील सकारात्मकतेचे महत्त्व पटवून दिले आणि स्वतःवर विश्वास ठेवल्यास कोणत्याही आव्हानांना कसे सामोरे जावे हे स्पष्ट केले. तसेच गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना उद्देशून सण साजरे करण्यामागील दिखाऊपणा पेक्षा भावना अधिक महत्वाच्या आहेत याबाबत सखोल मार्गदर्शन केले. 

सार्वजनिक गणेशोत्सव सुंदर सजावट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. सदर स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वेशभूषा अजिंक्य गणेश मंडळ रविवार पेठ वाई न्हावी आळी,सर्वोत्कृष्ट नेपथ्य श्री रणवीर गायकवाड , न्यू गजानन मंडळ गंगापुरी वाई, सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री कलाकार – स्नेहल जमदाडे , भूमिका – सावित्रीबाई फुले महात्मा फुलेनगर गणेशोत्सव मंडळ, सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष कलाकार – तेजस गजानन गुळूंबकर , भूमिका – आबाजी सोनदेव नवप्रकाश मंडळ भगवा कट्टा गंगापुरी वाई, स्थिर देखावा तृतीय क्रमांक मधली आळी गणेशोत्सव मंडळ , वाई , द्वितीय क्रमांक शिवदत्त गणेशोत्सव मंडळ गणपती आळी वाई , प्रथम क्रमांक धर्मपुरी अजिंक्य गणेशोत्सव मंडळ धर्मपुरी , वाई , जिवंत देखावा प्रोत्साहन पर बाल हनुमान गणेशोत्सव मंडळ सिद्धानाथ्वाडी वाई, बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ वाई, पाचवा क्रमांक ( विभागून ) अजिंक्य गणेश मंडळ रविवार पेठ वाई न्हावी आळी व अजित गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ वाई , चतुर्थ क्रमांक महात्मा फुलेनगर गणेशोत्सव मंडळ, तृतीय क्रमांक ( विभागून ) बाल गोपाल विशाल गणेशोत्सव मंडळ किसनवीर चौक वाई व भैरव प्रसाद मंडळ यात्रा मैदान गंगापुरी वाई, द्वितीय क्रमांक न्यू गजानन मंडळ गंगापुरी वाई व प्रथम क्रमांक गंगापुरी युवक मंडळ गंगापुरी वाई यांनी पारितोषिके पटकाविले. 

कार्याक्रमाचे आभार संस्थेचे संचालक श्री संजय वाईकर , सूत्रसंचलन सौ प्रीती कोल्हापुरे यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे , संस्थेचे उपाध्यक्ष ॲड श्री रमेश यादव, संचालक श्री अमर कोल्हापुरे , श्री मदन साळवेकर , डॉ मंगला अहिवळे , श्री श्रीकांत शिंदे , श्री शरद चव्हाण , श्री सालीमभाई बागवान , श्री संजय वाईकर , श्री सागर मुळे , श्री वैभव फुले , श्री भूषण तारू , श्रीमती नीला कुलकर्णी , श्रीमती अलका घाडगे व संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket