नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » प्रतापगडाचे संवर्धन शिवकालीन वैभव जपतच होणार; कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – पालकमंत्री शंभूराजे देसाई

प्रतापगडाचे संवर्धन शिवकालीन वैभव जपतच होणार; कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – पालकमंत्री शंभूराजे देसाई

प्रतापगडाचे संवर्धन शिवकालीन वैभव जपतच होणार; कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – पालकमंत्री शंभूराजे देसाई

महाबळेश्वर:ऐतिहासिक वारसा, स्वराज्याचा अभिमान आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या किल्ले प्रतापगड येथील संवर्धन व विकासकामांत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रतापगडाचे मूळ स्वरूप आणि ऐतिहासिक वैभव जपतच हे संवर्धन केले गेले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली आहे.

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज किल्ले प्रतापगडला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत एक सविस्तर आढावा बैठक घेतली.

भवानी माता मंदिरात आरती आणि कामांची प्रत्यक्ष पाहणी

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा व पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता गडावर पोहोचल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी सर्व कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गडदेवता भवानी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले व महाआरती केली. मंदिराच्या सभागृहातच पुढे आढावा बैठक पार पडली.

चुकीच्या कामावरून ठेकेदारांना फटकारले

या बैठकीत राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रतापगडावरील कामांची सद्यस्थिती आणि पूर्वीची स्थिती यावर सादरीकरण केले. यावेळी संवर्धनाच्या कामांची गती, दर्जा आणि तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

पाहणी दरम्यान काही ठिकाणी नवीन बांधकामाला योग्य पद्धतीने पाणी मारले (Curing) जात नसल्याची बाब समोर आली. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पालकमंत्री देसाई यांनी संबंधित ठेकेदारांना चांगलेच फटकारले.

 “प्रतापगडावर पाण्याची टंचाई असली, तरी ती सबब चालणार नाही. गरज भासल्यास टँकरद्वारे पाणी आणून काम दर्जेदारच केले पाहिजे. शिवकार्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही,” असे खडे बोल त्यांनी सुनावले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष; निधीची कमतरता भासणार नाही

पालकमंत्री देसाई यांनी सांगितले की, “प्रतापगड संवर्धनाच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” तसेच प्रतापगड संवर्धनासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पूर्ण पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

ऐतिहासिक स्वरूप जपण्यासाठी महत्त्वाच्या सूचना

झाडेझुडपे हटवणे:किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप स्पष्ट दिसण्यासाठी पुरातन तटबंदी आणि वास्तूंच्या परिसरातील अनावश्यक झाडेझुडपे तातडीने हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 वृक्षलागवड:छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात अधिकाधिक आणि योग्य प्रकारची वृक्षलागवड करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.

 सर्वांगीण विकास: या बैठकीत केवळ संवर्धनच नव्हे, तर गडावरील पर्यटन सुविधा, रस्ते, सार्वजनिक बांधकामे, वनविभागाशी संबंधित मुद्दे आणि स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांचाही आढावा घेण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, विजय नायडू, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ यांच्यासह गटविकास अधिकारी विजय विभुते, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक नागरिक आणि प्रतापगड परिसरातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या प्रतापगडाच्या या पाहणी दौऱ्यामुळे आणि पालकमंत्र्यांच्या कडक भूमिकेमुळे संवर्धनाच्या कामाला आता मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत. शिवकालीन वैभव पुन्हा दिमाखात उभे राहील, अशी आशा आता इतिहासप्रेमी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket