प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लोकसहभागातून डॉ सुधीर जगताप मित्र परिवार वतीने शुद्ध पाणी फिल्टर दिले.
कराड- वडगांव हवेली ता कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात डॉ सुधीर जगताप मित्र परिवार वतीने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा शुद्ध पाणी फिल्टर बसून दिले.त्याचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक संचालक जे के जगताप दादा, डॉ.सुधीर जगताप,जे जे जगताप, प्रताप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच राजेंद्र थोरात, प्रशांत काटवटे, ठावरे,रामभाऊ जगताप, उद्योजक सुहास जगताप, उत्तम जगताप आप्पा, आनंदराव जगताप, संतोष सांळुखे,अण्णासाहेब सुर्यवंशी, गायकवाड फौजी, सत्वशील जगताप, अमोल जगताप, संभाजी सांळुखे,जंगम, बाळासाहेब जगताप, शंकर पाटील,सुरज कुंभार, रमेश जगताप यांची उपस्थिती होती.शाळेच्या भौतिक सुविधा पुर्ण करण्यासाठी लोकसहभागातून शुद्ध पाणी फिल्टर बसून घेतला यासाठी एकुण सुमारे पन्नास हजार रुपये खर्च आला ही सर्व मदत डॉ. सुधीर जगताप मित्र परिवार यांच्या वतीने सुहास जगताप, आण्णा, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत काटवटे, अमोल जगताप,सागर मदने, संतोष मोहिते, विक्रम साळवे,अमृत जगताप, सत्वशील जगताप,सागर पाटसुपे, डॉ विशाल पाटील यांनी सहकार्य करून केले.
याबद्ल सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक पवार यांनी केले.सुत्रसंचलन निवास पोळ, अनिल लोकरे यांनी केले. व आभार विजया कदम यांनी मानले. यावेळी शिक्षक आनंदा पाटील,एस एम आवटे,मंगल पाटील,नंदा कराळे,मीना पाटील,मंगल सकटे,लालासो कुंभार, हणमंत पाटील, शिवाजी चव्हाण, अब्दुल मुल्ला व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
