Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » देशात 5 दिवस पासपोर्ट सेवा राहणार बंद

देशात 5 दिवस पासपोर्ट सेवा राहणार बंद 

देशात 5 दिवस पासपोर्ट सेवा राहणार बंद 

देशभरातील पासपोर्ट सेवा 5 दिवसांसाठी बंद राहणार आहे. पासपोर्ट विभागाने एक ॲडव्हायजरी जारी करुन याबाबतची माहिती दिली आहे. तांत्रिक देखभालीमुळं पासपोर्ट सेवा पोर्टल आजपासून म्हणजे 29 ऑगस्ट रात्री 8 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत बंद राहणार असल्याचे विभागाने म्हटले आहे. या कालावधीत पासपोर्ट केंद्रांवर कोणत्याही नवीन अपॉइंटमेंट्स शेड्यूल केल्या जाणार नाहीत. तसेच आधी बुक केलेल्या अपॉइंटमेंट्स पुन्हा शेड्यूल केल्या जाणार आहेत.

दरम्यान, एखाद्याला जर नवीन पासपोर्टकाढायचा असेल तर आता तुम्हाला 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्याचवेळी, जर तुम्ही आधीच नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्यासाठी 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तारीख मिळाली असेल, तर ती देखील रद्द केली जाईल आणि वाढवली जाईल. या पाच दिवसांमध्ये नागरिकांसाठी आणि सर्व MEA/RPO/BOI/ISP/DOP/पोलीस अधिकाऱ्यांसाठी ही प्रणाली उपलब्ध नसेल, असं पासपोर्ट विभागाने ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे.पाच दिवस विभागात कोणतेही काम होणार नाही.पाच दिवस विभागाचे कोणतेही काम होणार नाही. सेवा बंद झाल्याचा परिणाम पासपोर्ट सेवा केंद्र तसेच स्थानिक पासपोर्ट कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात दिसून येईल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket