गौरीशंकरच्या शैक्षणिक प्रगतीचा सार्थ अभिमान वाटतो- पद्मभूषण ङाॅ विजय भटकर
लिंब – प्रतिकूलतेतून यशाचे गौरीशंकर साकारणारे मदनराव जगताप यांनी साताराच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा दिली असून या माध्यमातून हाजारो विद्यार्थ्यांचे त्यानी उज्वल करिअर घडविले आहे त्याच्या या कार्याचा सार्थ अभिमान वाटतो असे मत पद्मभूषण संगणक तज्ञ डॉ विजय भटकर यांनी मत व्यक्त केले ते लिंब ता. जि सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकन ऐज्युकेशन अँन्ड रिसर्च लिंब महविद्यालयाला सदिच्छा भेटीप्रसंगी मत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप ,उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ अनिरुध्द जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर,पुणे येथील शैक्षणिक संस्था चालक बांदल साहेब, प्राचार्य डॉ योगेश गुरव, डॉ संतोष बेल्हेकर, डॉ धैर्यशील घाडगे, ङाँ.भूषण पवार, प्रबधंक निलेश पाटील ,विक्रम शिंगटे अदि प्रमुख उपस्थित होते.
पद्मभूषण पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ विजय भटकर पुढे म्हणाले कि दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणातून नवी पिढी सक्षमपणे घडविणे गरजेचे असून यासाठीच्या सर्वतोपरी सोयी सुविधा विद्यार्थ्यांना प्राप्त करुन देणे आवश्यक आहे. यासाठी गौरीशंकरने याबाबत केलेल्या उपाययोजना स्तुत्य आहेत.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप म्हणाले कि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मभूषण डॉ विजय भटकर याच्या सदिच्छा भेटीने आम्हाला स्फूर्ती मिळाली आहे त्याचे अनमोल मार्गदर्शन संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
प्रांरभी पद्मभूषण डॉ विजय भटकर यांना संस्थेतर्फे, शाल श्रीफळ बुके देवून संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप यांनी स्वागत केले.
यावेळी डॉ विजय भटकर यांनी लिंबच्या शैक्षणिक संकुलची पाहाणी करून समाधान व्यक्त केले .यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवसंशोधन करणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश गुरव , प्रा.ङाँ. संतोष बेल्हेकर,प्रा. डॉ धैर्यशील घाङगे, प्रा.ङाॅ. भूषण पवार ,प्रा शुभम चव्हाण, प्रा दुधेश्वरक्षीरसागर याचा पद्मभूषण ङाॅ.विजय भटकर यानी कार्याचा उचित गौरव केला.
यावेळी संस्थेच्या शैक्षणिक कामकाजाची माहिती प्रशासकीय अधिकारी नितिन मुडलगीकर यांनी दिली आभार प्राचार्य ङाॅ योगेश गुरव यांनी मानले.
– गौरीशंकर नॉलेज सिटी लिंबच्या शैक्षणिक संकुलनात पद्मभूषण ङाॅ विजय भटकर याचा 78 वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी डॉ विजय भटकर यांनी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला यावेळी संस्थेतर्फे स्मृतीचिन्ह व केक कापून त्याचे अभिष्ठचिंतन केले.