सर्व्हिस रोड वरील पडलेला खड्डा वाहनधारकांना ठरतोय जीवघेना
लिंब परिसरात सर्व्हिस रोडवर खड्डेच खड्डे यंत्रणेचे दुर्लक्ष..
लिंब – सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गौरीशंकर लिंब कॅम्पस समोरील सर्व्हिस रोडवर मोठा खड्डा हा अपघाताला नियंत्रण देत आहे .या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा असल्याने हा पडलेला मोठा खड्डा राष्ट्रीय महामार्ग रस्ता सुरक्षित विभागाने मुजवावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. पडलेल्या मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालकांना हा खड्डा दिसून येत नाही परिणामी या खड्ड्यात वाहने आदळून वाहनांच्या नुकसानी बरोबरच वाहन चालकांना दुखापतीला सामोरे जावे लागत आहे. रात्री या परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे .
चौकट -राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महामार्ग यंत्रणेची झालेली दुर्लक्ष वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहे . रस्ता अपघाताचे वाढते प्रमाण पाहता सर्व्हिस रोडवरील पडलेला मोठा खड्डा त्वरित मुजवून वाहन चालकांना दिलासा दयावा.
खराब रस्ते पण टोलमात्र सक्तीने वसूल करणार्या यंत्रणेला रस्त्यावर पडलेले खड्डे दिसत नाहीत का? असा संतापजनक प्रश्न नागरिक व वाहन चालक संबंधितांना विचारत आहेत पण याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करून वाहन चालकांकडून टोल वसुली करीत आहे.
श्रीरंग काटेकर सातारा