नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » ठळक बातम्या » पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा-पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा-पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा-पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

सातारा  : कराड- चिपळूण महामार्गावरील पाटण शहरांतर्गत रस्त्याचे काम खूप दिवसांपासून रखडलेले आहे. तसेच हा रस्ता खूप खराब झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तरी रस्ते विकास महामंडाळने पाटण शहरातील अंतर्गत रस्ता व जुना धांडे पूल पाडून नवा पुलसह रस्ते काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाटण शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कामामुळे वाहन धारकांना पर्यायी रस्ते दिले आहेत. हे रस्ते गावागावातून जात असल्याने या रस्त्यांवरुन अवजड वाहने जाणार नाहीत याची पोलीस विभागाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई जड वाहने ही आंबा घाट मार्गे सोडावीत. पाटण एसटी डेपो परिसरातील अतिक्रमणाबाबत न्यायालयाचा लवकर निकाल येईल, येणाऱ्या निकालाप्रमाणे राज्य परिवहन विभागाने कारवाई करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

पाटण तालुक्यातील अभयचीवाडीसह काही गावांत शेतकऱ्यांचे पिकांचे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून शेतीभवती सौर कुंपण अथवा चर यापैकी जो पर्याय प्रभावी आहे तो करावा. यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत दिली.

 नाव गावातील ग्रामस्थ पिढ्यानं पिढ्या वन विभागाची जमीन कसत असून त्यांची उपजिविका त्यावर अवलंबून आहे. ही जमीन वन विभागाने ताब्यात घेतली आहे. कसणाऱ्या शेतकऱ्यांना ही जमिन मिळावी यासाठीचा प्रस्ताव आयुक्तांमार्फत शासनाला सादर करा. याबाबत महसूल व वन यांची मंत्रालयात संयुक्त बैठक घेण्यात येईल व सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket