संयमी नेतृत्व मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसा निमित्त कोपर्डे हवेली येथे नेत्रचिकित्सा शिबीर संप्पन्न
कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख मा.मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त मनोजदादा युवा मंच कराड उत्तर व एच. व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबीर कोपर्डे हवेली येथील जिल्हा परिषद शाळा येथे पार पडले.
मा. मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस 26 मे रोजी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवढा आयोजित केलेला असून या पंधरा दिवसांमध्ये वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत. त्यातील एक शिबिर कोपर्डे हवेली येथे पार पडले या शिबिरामध्ये 1100 पेक्षा जास्त रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील 250 पेक्षा जास्त रुग्णांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे. जवळपास 900 पेक्षा जास्त लोकांना मोफत चष्मे वाटण्यात आले आहेत. या पंधरा दिवसांमध्ये अनेक प्रकारची आरोग्य शिबीर होणार आहेत. रक्तदान शिबिर, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, इत्यादींचा समावेश आहे. मा. संग्राम बापू घोरपडे,यावेळी एच.व्ही. देसाई हॉस्पिटलच्या प्रोजेक्ट मॅनेजर डॉक्टर कदम मॅडम ,श्री. माहेशबाबा जाधव, श्री. शंकरराव शेजवळ(काका), श्री. विनायक पिसाळ, श्री.संभाजी पिसाळ, श्री.तुकाराम ननावरे, श्री. विजय थोरात, श्री.महेश चव्हाण, श्री.युवराज साळवे, श्री.सोपान चव्हाण, श्री.सचिन चव्हाण, श्री.अक्षय चव्हाण, श्री.शरद चव्हाण, श्री.वैभव चव्हाण, श्री.जगदीश चव्हाण, श्री.आत्मराम चव्हाण, श्री.संभाजी पिसाळ, श्री.शैलेश चव्हाण, श्री.दादासो चव्हाण, श्री. दत्तात्रय चव्हाणआदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
22.5. 2024 रोजी तुळजाभवानी सांस्कृतिक भुवन पुसेसावळी येथे मोतीबिंदू शिबिराच्या जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनोजदादा युवा मंच यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.