शिवथर येथे पाटखळ जिल्हा परिषद गटाचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही.विरोधी उमेदवाराच्या नेत्यांचे साम्राज्य साडेतीन जिल्ह्यात मर्यादित उरले आहे. त्यांना वेळ भरपूर आहे, त्यामुळे आपल्या परिसरात घिरट्या मारण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. तसेच चार नाही तर ४० सभा घेतल्या तरी मला काही फरक पडणार नाही असे उदयनराजे म्हणाले.
विकास कामे करण्यासाठी लोक उमेदवार निवडून देत असतात. मात्र पवार साहेबांनी माझ्या विरोधात लकी ड्रॉ काढून भ्रष्टाचार केलेला उमेदवार उभा केलेला आहे. लोकांची दिशाभूल करून त्यांनी आतापर्यंत सत्ता मिळवली. मात्र सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी केला नाही, त्या उलट शेतकऱ्यांच्या मालकीचे असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना काँग्रेसने लावलेला आयकर केंद्रातील भाजप सरकारने माफ केला, शेतकऱ्यांना वंचितांना महिलांना आधार देणाऱ्या सरकारच्या पाठीशी आपल्याला राहिले पाहिजे.
किरण साबळे पाटील म्हणाले, विरोधक वावड्या उठतवत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे. ती काढून टाकण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. खासदार उदयनराजेंनी देश सांभाळावा तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी राज्याचे प्रतिनिधित्व करावे.
गीतांजली कदम म्हणाल्या, मान गादीला आणि मतही गादीलाच असं धोरण ठरवून एकत्र येऊन आपण वाटचाल करायची आहे. तुझं माझं करण्यात सगळ्यांचाच नुकसान होत असून परिसराचा विकास साधूया.
प्रभाकर साबळे म्हणाले, या निवडणुकीत कोणीही गाफील राहता कामा नये. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. विकास कामे करणाऱ्या नेत्यांसोबत आपण सर्वांनी एकत्र काम करूया.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण साबळे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर साबळे, भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य गीतांजली कदम, उपसरपंच प्रकाश साबळे, राजेंद्र जाधव, लक्ष्मण पाटील, मंगल साबळे, प्रदीप साबळे, दत्तात्रय साबळे, जितेंद्र पिसाळ, सनी साबळे, सुजित साबळे, सर्जेराव साबळे, रयत क्रांतीचे प्रकाश साबळे, रूपाली शिंदे, विकास शिंदे, महेश साबळे, निलेश नलावडे, डॉ. शशिकांत साळुंखे आदींची उपस्थिती होती.