Home » ठळक बातम्या » आरोग्य » राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल

मुंबई : (सुनील जाधव पाटील )राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार बाबासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके आदी उपस्थित होते.

नितीन पाटील हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. त्याबरोबरच माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीवभाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार दौऱ्यात अजित पवार यांनी वाईतील मतदारांना नितीन पाटील यांना खासदार करणार म्हणून शब्द दिला होता. त्या शब्दाला जागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. तर आज पक्षाचे नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Post Views: 88 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक

Live Cricket