उंब्रज तालुका कराड येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक
उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी मोट्या प्रमाणात गर्दी केली होती. उंब्रज गावामध्ये पहिल्यांदाच अशी घटनां घडल्यामुळे नागरिकांच्या वेगवेगळ्या चर्चेना उधाण आले होते. गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायती समोरील रस्त्यावर लहान मुले खेळत होती. खेळत असताना नाल्यामध्ये त्यांना अर्भक दिसल्यावर त्यांनी आरडाओरडा सुरू केल्या नंतर आजूबाजूच्या लोकांनी लहान मुले का ओरडत आहेत म्हणून पाहण्यासाठी गेली असता नाल्यामध्ये अर्भक दिसले सदरची माहिती जमलेल्या स्थानिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर घटनास्थळी उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर झाले पोलिसांनी घटनास्थळावरील पंचनामा करून ते अर्भक अंबुलन्स मधून पोस्टमार्टम साठी कराड सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले. याबाबत अधिक तपासून उंब्रज पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी करत आहे.