Home » राज्य » शिक्षण » स्मार्टअस’ मार्फत राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धा उत्साहात

स्मार्टअस’ मार्फत राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धा उत्साहात

स्मार्टअस’ मार्फत राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धा उत्साहात

अकरा राज्यांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

सातारा : महाराष्ट्रासह अकरा राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाºया ‘स्मार्टअस एज्युकेशन’ या संस्थेमार्फत अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेसाठी अकरा राज्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील विजेत्यांना त्याचठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील तीस जिल्हे आणि अकरा राज्यांमध्ये ‘स्मार्टअस एज्युकेशन’ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत स्मार्टअस नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धा घेण्यात आली होती. बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे नियोजन दोन सत्रामध्ये करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात सर्व सहभागी विद्यार्थ्यांची अबॅकस परीक्षा घेण्यात आली. मुलांची एकाग्रता, आत्मविश्वास, स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता वाढविणारे अबॅकस खरंच ही उद्दिष्टे साध्य करते, हे मुलांनी दाखवून दिले. अवघ्या सहा ते दहा मिनिटात विद्यार्थ्यांनी दीडशेपैकी दीडशे गणिते सोडवली. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचा निकाल काढून सायंकाळच्या दुसºया सत्रामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना एक लॅपटॉप, पाच सायकल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पदक अशी बक्षिसे देण्यात आली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री अश्विनी महांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे संचालक डॉ नरेंद्र शेलार, स्मिता शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे ओळखून विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता अनुभव पाठीशी ठेवावा. अनुभवातून पुढील वर्षी अधिक प्रयत्न करून तुम्हीही स्पर्धेमध्ये बक्षीस जिंकू शकता, असा विश्वास डॉ. नरेंद्र शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. नरेंद्र शेलार आणि स्मिता शेलार या दोघांच्या खांद्यावर उभा असलेला स्मार्टअस एज्युकेशन हा डोलारा कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या राज्यातून परीक्षेसाठी आलेले सर्व विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. कारण फक्त अभ्यासच नाही तर अबॅकससारख्या अवांतर उपक्रमाचा अनुभव तुमच्या पल्याला देऊन तुम्ही त्यांना आत्मविश्वास देत आहात.

– अश्विनी महांगडे, सिनेअभिनेत्री

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

माऊली, माऊली” गजरात महाबळेश्वरच्या गिरिस्थान प्रशालेत बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात

Post Views: 30 माऊली, माऊली” गजरात महाबळेश्वरच्या गिरिस्थान प्रशालेत बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात महाबळेश्वर: “माऊली! माऊली!” च्या जयघोषात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि

Live Cricket