पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य सत्यजित पतसंस्थेकडून 150 कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार – मा.नामदेव पाटील( संस्थापक चेअरमन )
कराड प्रतिनिधी: पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य वारूंजी ता. कराड येथील सत्यजित ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेने सभासदांसह ठेवीदार व कर्जदार तसेच हितचिंतकांच्या विश्वासामुळे चालू आर्थिक वर्षात (२०२३-२०२४) मध्ये १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती सत्यजित पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व पंचायत समितीचे माजी सदस्य नामदेव पाटील यांनी दिली.
सत्यजित पतसंस्थेस ठेवीदार, कर्जदार, सभासद, हितचिंतक यांचे आतापर्यंत सहकार्य लाभले असून भविष्यातही ते असेच मिळत राहील, अशी आशा व्यक्त करून नामदेव पाटील म्हणाले, ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेच्या ठेवी ८२ कोटी झाल्या असून संस्थेने ६५ कोटीची कर्ज वितरण केली आहेत. संस्थेचे वसूल भाग भांडवल २ कोटी ९० लाख असून संस्थेचा स्वनिधी ६ कोटी ६० लाख आहे. सत्यजित पतसंस्थेची बँकांतील गुंतवणूक २४ कोटी ७७ लाख असून संस्थेचा निव्वळ नफा १ कोटी १५ लाख आहे. ३१ मार्च २०२४ अखेर ६१५३ सभासद आहेत, अशी नामदेव पाटीलसाहेब यांनी दिली.
संस्थेने ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर राष्ट्रीयकृत बँकेची बँक गॅरेटी दिली आहे. संस्थेच्या प्रगतशील वाटचालीत सर्व संचालक, सभासद, खातेदार, हितचिंतक यांचा सिंहाचा वाटा असल्याचे नामदेव पाटील यांनी आवर्जून सांगितले.