व्यापक आणि सकारात्मक बदलांसाठी मनोजदादाच सर्वोत्तम: प्रा.दशरथ सगरे
सातारा :नवनिर्वाचित आमदारांचा यशोदा इन्स्टिट्यूट तर्फे सत्कार कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचे मनोजदादा घोरपडे यांनी मताधिक्य मिळवत निवडणूक जिंकली, त्यांच्या या विजयी वाटचालीचे कौतुक करत यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. युवा कार्यकर्त्यांचे प्रभावी संघटन करण्याचे कौशल्य, शेतकरी आणि महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन, मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबिरांचे आयोजन याचबरोबर सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मनोज दादा घोरपडे यांनी केलेले कार्य डोळ्यासमोर ठेवून जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधानसभेमध्ये पाठविले असल्याचे मत प्रा. दशरथ सगरे यांनी यावेळी व्यक्त केले.
समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभागासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी , श्री संजय मोरे, श्री संजय शेलार, श्री रणजीत घाडगे, दिलीप पवार विशाल पवार, राजेंद्र यादव, महेश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक प्रशासन राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करणे हे गरजेचे असते. आपल्या भागातील विविध विकास कामंसाठी निधी खेचून आणण्याची धमक नवनिर्वाचित आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या अंगी असल्याचे देखील प्रा. सगरे यावेळी म्हणाले.
त्यांच्या या विजयी वाटचालीसाठी तसेच त्यांचे प्रगल्भ, व्यापक, सकारात्मक कार्य अशाच प्रकारे उत्तरोत्तर घडत राहो. त्यांच्या हातून समाज उन्नतीची अधिकाधिक कार्य घडावे. महान असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत राहण्यासाठी त्यांच्या कार्यालI यशोदा इन्स्टिट्यूट कडून शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनिर्वाचित आमदार मनोज दादा घोरपडे यांचा सत्कार करताना यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, यावेळी संजय मोरे, संजय शेलार, रणजीत घाडगे, दिलीप पवार विशाल पवार, राजेंद्र यादव, महेश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
