Home » ठळक बातम्या » शिरवळ मध्ये भव्य तालुका क्रीडा संकुल उभारणार-आ.मकरंद पाटील

शिरवळ मध्ये भव्य तालुका क्रीडा संकुल उभारणार-आ.मकरंद पाटील 

शिरवळ मध्ये भव्य तालुका क्रीडा संकुल उभारणार-आ.मकरंद पाटील 

सातारा -खंडाळा तालुक्याने माझ्यावर खूप प्रेम केलं आहे.प्रत्त्येक निवडणुकीत मला प्रचंड मतदान करून निवडून दिलं आहे.म्हणूनच खंडाळा तालुक्यासाठी अहोरात्र झटतोय.नीरा देवधर ची योजना येताच खंडाळा तालुका टंचाईमुक्त करून या तालुक्यात औद्योगीकरण वाढउन रोजगार निर्मिती करणार आणि शिरवळ मध्ये भव्य क्रीडा संकुल उभारणार असल्याचा निर्धार आ.मकरंद पाटील यांनी केला.

शिरवळ येथील विराट सभेत आ.पाटील बोलत होते.या प्रसंगी जेष्ठ नेते बकाजीराव पाटील,नितीन बापू धूरगुडे,दत्ता नाना ढमाल,उदय कबुले,शामराव गाढवे,सुनील शेळके,राजेंद्र तांबे,मकरंद मोटे,रविराज दुधगावकर,ताहेर काझी,सागर शेळके,चंद्रकांत मगर,आप्पासाहेब देशमुख,अजय भोसले,छाया जाधव,आदेश भापकर,विजय गायकवाड,शारदा जाधव,विजय जाधव,इ.मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना आ.मकरंद पाटील म्हणाले की 

१९ च्या निवडणुकीत तुम्ही मला जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल १३३००० मते देऊन तब्बल ४४ हजार मतांनी निवडून दिले.मागील १५ वर्षांमध्ये तुमचे असंख्य प्रश्न मी मार्गी लावले आहेत.शिरवळ मधील तालुका क्रीडा संकुलसाठी निधी मंजूर करून दिला आहे.म्हणूनच शिरवळ मध्ये भव्य क्रीडा संकुल उभारणार.कारखाने ताब्यात दिले पण प्रचंड कर्जबाजारी कारखाने चालवायचे कसे हा प्रश्न होता.सहकारातील दोन मंदिरे म्हणजेच हे दोन्ही कारखाने वाचवले पाहिजेत म्हणून महायुती मध्ये गेलो अन्यथा या दोन्ही कारखान्यांचा लिलाव झाला असता.महायुती मध्ये गेल्यामुळे ४६७ कोटी मिळाले.आणि कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची २०१९ ची मागील ५४ करोड रुपयांची देणी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली.दुष्काळी परिस्थितीमध्ये खंडाळा तालुक्याला ५५ टीएमसी पाणी घेतले.भविष्यात होणाऱ्या देवधरच्या पाण्याने तब्बल २७००० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.त्यामुळे खंडाळा तालुक्याचा पाणीप्रश्न कायम स्वरुपी मिटउन तालुक्यात औद्योगीकरण वाढवणार आहे.त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल.इथल्या बाजारपेठा वाढतील.सभेची आजची विक्रमी गर्दी पाहून माझा विजय निश्चित आहे.भविष्यात सुद्धा विकासासाठी तुम्ही जे जे मागाल ती प्रत्येक गोष्ट मी पूर्ण करणारच असा निर्धार ही या प्रसंगी आ.मकरंद पाटील यांनी केला.

 प्रास्ताविकपर भाषणात शिरवळचे सरपंच रविराज दूध गावकर म्हणाले की आबांना शिरवळ मध्ये प्रचंड लिड मिळणार आहे.शिरवळ मधील प्रत्त्येक प्रश्न सोडविण्यासाठी मौलिक अशी मदत आबांनी दिलीय…करोडो रुपयांची कामे शिरवळ मध्ये झाली आहेत.महात्मा फुले भाजी मंडई उभाण्यासाठी आबांची साथ,मार्गदर्शन लाभले आहे.

माजी सरपंच दशरथ निगडे म्हणाले की..मकरंद आबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला समजून घेतलं आहे.

लोकशक्ती पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष विजय बापू गायकवाड म्हणाले की मकरंद आबांना तिन्ही तालुक्यातून मिळणारा पाठिंबा पाहून विरोधक नामोहरम झालेत.मकरंद आबा एक लाखाच्या फरकाने निवडून येतील..

खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र तांबे म्हणाले की आबांना मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने केले आहे.आबांची राज्य सरकारवर तेवढी पकड असल्याने आबांनी एवढी प्रचंड विकासकामे केली आहेत.ज्या ज्या वेळी आम्ही पैसे मगितले त्या त्या वेळी आबांनी विकासकामांसाठी पैसे दिलेत.आबा जसे निधी द्यायला कमी पडत नाहीत मग आपण आबांना मते द्यायला का कमी पडायचं.

उदय दादा कबूले म्हणाले की आ. मकरंद पाटील यांचे सारखं नेतृत्व मिळालं हे आमचं भाग्य आहे.आबा तिन्ही तालुक्यातील तरुणाईच तुमच्यावर प्रचंड प्रेमआहे,विश्वास आहे,मकरंद आबांनी माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून संधी दिली.आता तर नितीन बापू भुरगुडे आणि मी एकत्रित काम करतोय.तालुक्यातील ६५ गावात आबांच्या माध्यमातून हजारो कोटींची कामे झाली आहेत.महाराष्ट्रात आजपर्यंत मत्री पद नाकारणारा एकमेव नेता म्हणजे आपले मकरंद आबा.आबांनी मंत्री नसताना साडे चार कोटींची कामे केली.मग आता आबा मंत्री झाल्यावर तर ४० कोटींची कामे करतील.खंडाळा तालुक्याचा स्वाभिमान मकरंद आबांनी जागवला.मकरंद आबांनी या तालुक्याला संधी दिली.

नितीन भूर्गुडे पाटील म्हणाले की ही निवडणूक खूप सोपी आहे.ज्या निवडणुकीत विरोधी पक्षांना मकरंद आबांच्या बद्दल बोलायला मुद्देच नाहीत ती सोप्पी निवडणूक.अस एक गाव नाही ज्या ठिकाणी आबांची कोट्यवधी रुपयांची कामे झाली नाहीत.मकरंद पाटील यांच्या मध्ये ताकत आहे.नीरा देवधर योजनेच्या कामाचे खरे शिल्पकार मकरंद पाटील आहेत.या निवडणुकीत आपल्याला आमदार निवडून द्यायचा नाही तर मंत्री निवडून द्यायचा आहे.म्हणूनच भविष्यातील मंत्री आ.मकरंद पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्या.

सूत्रसंचालन जितेंद्र मगर यांनी केले.प्रास्ताविक रविराज दूधगावकर यांनी केले.

लोकजनशक्ती पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष यांनी या प्रसंगी आ.मकरंद पाटील यांना पाठिंबा जाहीर करून लोक जनशक्तीचे सर्व कार्यकर्ते आ.मकरंद पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रत्त्येक घरोघरी जाऊन आ.मकरंद पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत असे सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 16 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket