महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी संबंधीत आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे. अशी माहिती सोशल मीडियाद्वारे नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी दिली.